esakal | ‘घरात येऊ, कोरोना लस देऊ’; पुण्यात उपक्रम सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

‘घरात येऊ, कोरोना लस देऊ’; पुण्यात उपक्रम सुरु

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी कसबा विधानसभा मतदारसंघात (Kasba Assembly Constituency) ‘घरात येऊ, कोरोना लस देऊ, हा उपक्रम सुरु केला आहे. या माध्यमातून दिव्यांग, वयोवृद्ध आणि अंथरुणावर खिळून पडलेल्या व्यक्तींना त्यांच्या घरी जाऊन कोरोना लस (Corona Vaccine) दिली जाणार आहे. यासाठी तीन फिरते लसीकरण केंद्र सुरु केले आहेत. नागरिकांना घरोघरी जाऊन लस देण्याचा हा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम (Undertaking) असून तो स्तुत्य असल्याचे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. (Corona Vaccination Undertaking in Home Pune Hemant Rasane)

कसबा मतदारसंघातील नागरिकांसाठी बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर प्रशालेत सुरू केलेल्या कोविड लसीकरण केंद्र आणि तीन फिरत्या लसीकरण केंद्राचे उद्घाटन गुरुवारी पाटील यांनी केले. याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी खासदार गिरीश बापट, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, महापौर मुरलीधर मोहोळ, आयोजक व पुणे मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर, सरचिटणीस राजेश पांडे, दत्ता खाडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: पाटस : म्युकरमायकोसिसच्या दोन रुग्णांचा मृत्यू

या माध्यमातून २० जूनपर्यंत सुमारे सहा हजार २०० घरांमध्ये जाऊन कोरोना लस देण्याचे नियोजन केले आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाअंतर्गत लसीकरण करण्यासाठी तीन गाड्या कसबा मतदारसंघामध्ये फिरणार आहेत. त्यामध्ये लसीकरणासाठी आवश्‍यक साहित्य, सुविधा व डॉक्टरांचे पथक असेल. ज्यांना घराबाहेर पडणे शक्य नाही, अशा नागरिकांची या उपक्रमामुळे सोय होणार असल्याचे हेमंत रासने यांनी सांगितले.