esakal | पाटस : म्युकरमायकोसिसच्या दोन रुग्णांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

पाटस : म्युकरमायकोसिसच्या दोन रुग्णांचा मृत्यू

पाटस : म्युकरमायकोसिसच्या दोन रुग्णांचा मृत्यू

sakal_logo
By
अमर परदेशी, वरवंड

पाटस : कोरोनानंतर उद्भविणाऱ्या म्युकरमायकोसिसच्या आजाराने ग्रामीण भागात डोकेदुखी वाढविली आहे. दौंड तालुक्यातील पाटस येथील वीस दिवसांत म्युकरमायकोसिसच्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक शिक्षक व एका बत्तीस वर्षीय तरुणाचा समावेश आहे. नागरीकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

हेही वाचा: नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पास जमीन देण्यास शेतकऱ्यांचा नकार

सध्या दौंड तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येचा आलेख कमी होत असला तरी म्युकरमायकोसिसच्या आजाराचे रुग्ण आढळून येवू लागले. कोरोनाबाधित किंबहुना कोरोनाला हरवून घरी परतेलेल्या काही रुग्णांना म्युकरमायकोसिस आजार होत आहे. पाटस येथे म्युकरमायकोसिस वीस दिवसांत दोन जणांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधित रुग्णांनी बरे झाल्यानंतर काळजी घेणे गरजेचे आहे. डोळे लाल होणे किंवा आणखी काही लक्षणे दिसल्यास तत्काळ आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पाटस आरोग्य उपकेंद्राच्या डाॅ. अंकीता कुलकर्णी यांनी केले.

हेही वाचा: पुणे-पिंपरी चिंचवडमधील मेट्रोसाठी आता डिसेंबरचा मुहूर्त !