esakal | राज्यात कोरोना लसीचे डोस खरंच पडून आहेत?; राजेश टोपेंनी दिलं स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

covid doses

पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं.

राज्यात कोरोना लसीचे डोस खरंच पडून आहेत?; राजेश टोपेंनी दिलं स्पष्टीकरण

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुण्यातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. यावेळी राज्यात केंद्रानं पाठवलेले कोरोना लसीचे लाखो डोस पडून असल्याच्या चर्चांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं.

पुण्यातील जम्बो कोविड सेंटर्स पुन्हा होणार सुरु; आरोग्य मंत्री राजेश टोपेंची माहिती

टोपे म्हणाले, मधल्या काळात केंद्र सरकारकडून असं सांगण्यात आलं होतं की राज्याला आम्ही ५८ लाख कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस दिले काही दिवसांपासून यातील २० एक लाख पडून आहेत. मात्र, असा कुठलाही प्रकार झालेला नाही. दररोज राज्यात तीन लाख डोसचं लसीकरण होत आहे. आता खासगी रुग्णालयात आणि ग्रामीण भागातील आरोग्य उपकेंद्रांवरही आपण लसीकरण सुरु करतोय. 

लसीकरणाचा दुसरा टप्पा तीन महिन्यांत पूर्ण करणार

यापुढे जे जे लोक लसीकरणाची मागणी करतील त्या सर्वांचे अर्ज आम्ही केंद्राकडे पाठवून त्यावर मंजुरी घेणार आहोत. आम्हाला आता मोठ्या प्रमाणावर आणि वेगानं लसीकरण करायचं आहे. लसीकरणाच्या माध्यमातून आपला हेल्थ वर्कर्स, फ्रन्टलाईन वर्कर्स, ४५ वयापेक्षा अधिक कोमॉर्बिड रुग्ण आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरीक अशा  १ कोटी ७७ लाख लोकांचं लसीकरण तीन महिन्यांत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. या सर्वांना एकूण २ कोटी २० लाख डोस लागणार आहेत. त्यामुळे लसीकरणावर आम्ही अधिक लक्ष केंद्रीत केलं आहे. 

राज्यात ४५ लाख लसीकरण पूर्ण

राज्यात लसीकरणाच्या अनुषंगानं ४५ लाख लसीकरण झालेलं आहे. सरकारी आरोग्य संस्थाची हॉस्पिटल, पीएसईज, मेडिकल कॉलेजची रुग्णालयं, महापालिकांचे दवाखाने या सर्वांमध्ये मिळून दररोज २,४०० रुग्णालयांमध्ये दररोज लसीकरण सुरु आहे. ६०० खासगी रुग्णालयांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे एकूण ३,००० रुग्णालयांमध्ये सध्या दररोज लसीकरण सुरु आहे, अशी माहिती यावेळी आरोग्यमत्र्यांनी दिली. 
 

loading image
go to top