आजपासून १२ ते १४ वयोगटासाठी Corbevax लस; वृद्धांच्या तिसऱ्या लशीचा श्रीगणेशा

कोरोना प्रतिबंधक लसीकरणात १२ ते १४ या आणखी एका वयोगटाचा समावेश करण्यात आला. या अंतर्गत कॉर्बेव्हॅक्स ही लस पुण्यासह राज्यात येत्या बुधवारपासून (ता. १६) देण्यात येणार आहे.
Corona Vaccine
Corona VaccineSakal
Summary

कोरोना प्रतिबंधक लसीकरणात १२ ते १४ या आणखी एका वयोगटाचा समावेश करण्यात आला. या अंतर्गत कॉर्बेव्हॅक्स ही लस पुण्यासह राज्यात येत्या बुधवारपासून (ता. १६) देण्यात येणार आहे.

पुणे - कोरोना प्रतिबंधक लसीकरणात (Corona Preventive Vaccination) १२ ते १४ या आणखी एका वयोगटाचा समावेश करण्यात आला. या अंतर्गत कॉर्बेव्हॅक्स (Corbevax) ही लस पुण्यासह राज्यात येत्या बुधवारपासून (ता. १६) देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यात लशींचे ३९ लाख डोस मिळाले आहेत. दुसरीकडे, देशातील वयोवृद्धांना तिसरा डोस देण्याचा श्रीगणेशा होणार आहे.

कोरोनाच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी लस हेच सर्वांत प्रभावी माध्यम असल्याचे तिसऱ्या लाटेच्या उद्रेकात अधोरेखित झाले. लस घेतलेल्या बहुतांश जणांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही. काही जणांना झाला तरीही त्याची कोणतीही ठळक लक्षणे नव्हती किंवा तो सौम्य होता. लसीकरणामुळे रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले नाही. त्यामुळे आतापर्यंत १५ ते १८ वर्षे वयोगटपुढील नागरिकांना लसीकरण खुले केले होते. लसीकरणाचा वय आता १२ वर्षांपर्यंत कमी करण्यात आले.

Corona Vaccine
पुणे जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या नऊशेच्या खाली

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई म्हणाले, ‘‘राज्य सरकारला केंद्राकडून कॉर्बेव्हॅक्स कोरोना प्रतिबंधक लशींचे ३९ लाख लशीचे डोस मिळाले आहेत. त्याचे वितरण आरोग्य खात्याच्या परिमंडळांना केले आहे. तेथून पुढे प्रत्येक जिल्ह्यात आणि महापालिकांना होईल. कॉर्बेव्हॅक्स लशीचे वितरणाची प्रक्रिया आता सुरू आहे.’’

पुणे शहर, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा यासाठी राज्य सरकारकडून एक लाख दोन हजार सहाशे लशीचे डोस आले आहेत. त्यापैकी पुण्याच्या ग्रामीण भागासाठी ४८ हजार १०० डोसचे वितरण करण्यात आले. पुणे महापालिकेसाठी ३३ हजार आणि पिंपरी-चिंचवडसाठी २१ हजार ५०० लशीच्या डोसचा पुरवठा झाला आहे.

- डॉ. संजय देशमुख, सहायक संचालक (वैद्यकीय), पुणे परिमंडळ, आरोग्य खाते

महापालिकेला ‘कॉर्बेव्हॅक्स’ लशींचे ३२ हजार ४०० डोस मिळाले आहेत. येत्या बुधवारी (ता. १६) शहरातील २९ लसीकरण केंद्रांवर ही लस देण्यात येणार आहे. या सर्व केंद्रांवर मिळून प्रत्येकी १५० याप्रमाणे ४ हजार ३५० डोसचे नियोजन करण्यात आले आहे. पुण्यात सुमारे १ लाख ७५ हजार मुलांना या लशीचा डोस देण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.

- डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी, पुणे महापालिका

Corona Vaccine
जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजीला पर्याय नाही - अजित पवार

आवश्यक कागदपत्र...

लसीकरणासाठी येताना आधारकार्ड किंवा अन्य ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. याशिवाय दिव्यांग मुलांना लसीकरण केंद्रावर प्राधान्याने डोस देण्यात येईल. त्यांनी सोबत दिव्यांग प्रमाणपत्र आणावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.

पुण्यात २९ केंद्रांवर लसीकरण

करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेअंतर्गत १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना बुधवारपासून ‘कॉर्बेव्हॅक्सग’ लस देण्यास सुरुवात करण्यात येणार असून, २९ केंद्रांवर त्याचे नियोजन करण्यात आले आहे. १५ मार्च २०१० या दिवशी किंवा त्यापूर्वी जन्मलेल्या मुलांना ही लस घेता येणार आहे. त्यासाठी पुणे शहरातील २९ केंद्रांवर प्रत्येकी १५० डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शहरात ऑनलाइन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन, अशा दोन्ही पद्धतीने ५०-५० टक्के लशीचे वाटप करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com