esakal | गर्दी न करता सण साजरे करा - अजित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

गर्दी न करता सण साजरे करा - अजित पवार

गर्दी न करता सण साजरे करा - अजित पवार

sakal_logo
By
मिलिंद संगई, बारामती.

बारामती : कोरोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर आगामी सर्वच सण साजरे करताना गर्दी होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी केले. प्रशासनाने काटेकोरपणे परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पवार यांनी आज प्रशासनासोबत आढावा घेतला, त्या नंतर त्यांनी या सूचना दिल्या.

पवार म्हणाले की, सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सण समारंभ गर्दी न करता साजरे करावेत. कोरोना बाधींतांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजनामध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरुन बारामती शहरात तसेच ग्रामीण भागात सोयी सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी कण्हेरी फळरोपवाटीका, वन उद्यान, देसाई इस्टेट, क्रिडा संकुल, कालवा सुशोभिकरण कामांची पाहणी करुन सूचना दिल्या. परिवहन आयुक्त कार्यालयातून बारामतीच्या उप प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी मिळालेल्या नवीन इंटरसेप्टर वाहनाचे पूजन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशार पाटील, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर, मोटार वाहन निरीक्षक चंद्रमोहन साळोखे व नंदकिशोर काळे व इतर अधिकारी उपस्थित होते. या वाहनामध्ये स्पीड गन, ब्रीथ ॲनालायझर व टील्ट मीटर बसवीले आहेत. त्यामुळे जादा वेगाने वाहन चालविणा-यांसह मद्यपान करुन वाहन चालविणा-यांचीही तपासणी करता येणार आहे.

loading image
go to top