Coronavirus : आदिवासींच्या मदतीला धावले कुणबी

Corona virus farmers Help to tribal people in Pune District
Corona virus farmers Help to tribal people in Pune District

करंजगाव (पुणे) : संपूर्ण देशात कोरोना विषाणूंचा धुमाकूळ चालू असताना लॉकडाऊनमुळे अनेकांवर अर्धपोटी व उपाशीपोटी राहण्याची वेळ आली आहे. या संकटात प्रामुख्याने खेडोपाडी असलेला आदिवासी बांधव सापडला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अशात परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भाजगाव येथील आदिवासींच्या घरी घरपोच धान्य पोहचवण्याचे काम किरण बिनगुडे, स्वप्निल बिनगुडे, रमेश भुरुक, पंकज आढाव, नवनाथ पवार, अतुल वायकर, मोहित कदम आदी तरुणांनी केले आहे.

धक्कादायक ! दारुच्या तुटवड्यामुळे केरळमध्ये आत्महत्येच्या प्रमाणात वाढ

दरम्यान, भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा एक हजाराच्या वर गेला असून ही भारतासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. सध्या भारतात कोरोनाची कम्युनिटी लागण होण्याची शक्यता असून देशात कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाची लागण अधिकांना होऊ नये यासाठी मोदींनी देशात 21 दिवसांच्या लॉक डाऊनची घोषणा केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com