esakal | कडक निर्बंध, तरीही बारामतीत कोरोनाची साखळी तुटेना

बोलून बातमी शोधा

corona testing

बारामतीत तपासणींची संख्या दररोज एक हजारांच्या आसपास आहे. पुणे जिल्ह्यात तपासणीच्या संख्येत बारामती तालुका आघाडीवर आहे.

बारामतीत कडक निर्बंध, तरीही कोरोनाची साखळी तुटेना
sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती - कडक लॉकडाऊनसह मास्क, सॅनेटायझर, सोशल डिस्टन्सिंगसारखी काळजी सध्या नागरिक घेत आहेत. असे असले तरी कोरोना रुग्णांचा आकडा मात्र वाढताना दिसत आहे. बारामतीतही नव्या रुग्णांचा आकडा तीनशेच्या खाली येत नसल्याने आता नेमके आता काय करायचे असा प्रश्न प्रशासनापुढे आहे. पाच एप्रिलपासून बारामतीत व्यवहार बंद आहेत. दोन आठवड्यांचा कालावधी उलटूनही कोरोना रुग्णांचा सरासरी आकडा तीनशेच्या खाली आलेला नाही.

बारामतीत तपासणींची संख्या दररोज एक हजारांच्या आसपास आहे. पुणे जिल्ह्यात तपासणीच्या संख्येत बारामती तालुका आघाडीवर आहे. साखळी तोडण्यासाठी तपासण्यांची संख्या वाढवा असा शासनाचा आग्रह असल्याने बारामतीत शासकीय व खाजगी तपासण्यांचा आकडा हा सातत्याने हजारांच्या घरात आहे. त्यामुळे पॉझिटीव्ह येणा-या रुग्णांचीही संख्या अधिकच राहत आहे. बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातही तपासण्या सुरु होणार असल्याने आता ग्रामीण भागातील लोकांनाही बारामतीपर्यंत येण्याची गरज भासणार नाही. शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन पाळला जात आहे, मात्र रुग्ण संख्या आटोक्यात येत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा: भाजप आमदाराच्या नातेवाईकाचा पुण्यात काँग्रेस प्रवेश

आजची बारामतीची स्थिती

  • कालचे तपासलेले नमुने- 1039

  • बारामतीतील पॉझिटीव्ह रुग्ण- 311

  • प्रतिक्षेतील अहवाल- 136

  • बारामती शहर- 141 व ग्रामीण- 170

  • एकूण रुग्णसंख्या- 15476

  • बरे झालेल्या रुग्णांची संख्या- 11514

  • मृत्यूची संख्या- 270

  • एकूण लसीकरण-82219

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

बारामतीत प्रशासन व सेवाभावी संस्थांच्या वतीने कोविड केअर सेंटर्स सुरु करण्यात आली आहे. यामध्ये सर्वांच्या निवासासह भोजन व औषधोपचाराची विनामूल्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शहरात आजही ऑक्सिजन व व्हेंटीलेटर बेडची कमतरता जाणवत होती.