Corona Virus : अत्यवस्थ रुग्णांचे प्रमाण होतेय कमी

 Corona virus the number of emergency patients is low in Pune city
Corona virus the number of emergency patients is low in Pune city

पुणे  : कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरीही अत्यवस्थ होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. लसीकरणाच्या मोहिमेला वेग येत असल्याने भविष्यात अत्यवस्थ रुग्णांची संख्या आणखी कमी होईल, असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला.

पुण्यात गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण होते. त्यानंतर डिसेंबरपर्यंत रुग्णांची संख्या कमी झाली आणि आता फेब्रुवारीनंतर पुन्हा वाढत असल्याचे आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून दिसते. या पार्श्वभूमिवर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांशी ‘सकाळ’ने संवाद साधला.

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून एक हजार ८००च्या दरम्यान नव्या कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. या प्रमाणात गेल्या वर्षी १७ ऑगस्टला रुग्ण आढळले होते. त्या वेळी अतिदक्षता विभागात ७४८ रुग्ण होते. पण, आता ही संख्या ३४८ पर्यंत कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्य विभागाच्या पुणे परिमंडळाचे सहायक संचालक (वैद्यकीय) डॉ. संजय देशमुख यांनी दिली.

ते म्हणाले, ‘‘कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली त्याचवेळी लसीकरणाची मोठी मोहीम सुरू आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असली तरीही त्यात अत्यवस्थ होणाऱ्यांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. सध्या आपल्याकडे मुबलक वैद्यकीय ऑक्सिजन उपलब्ध आहे, बेडस् आहेत, तसेच डॉक्टरांनाही कोरोनाच्या रुग्णांवर कोणत्या टप्प्यावर कोणते उपचार करणे आवश्यक आहे, याचा अनुभव आला आहे.’’

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
 

लस घेतल्यावरही कोरोना झाला तरीही लसीकरणामुळे अत्यवस्थ होण्याचा धोका कमी होता. त्यामुळे रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागत नाही. आणि दाखल करावे लागलेच तरीही रुग्ण व्हेंटिलेटर जाण्याची शक्यता कमी असते, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी स्पष्ट केले.

उद्रेकाची तीव्रता कमी
तारीख           कोरोनाबाधित   आयसीयूतील रुग्ण  व्हेंटीलेटवरील रुग्ण
१७ ऑगस्ट २०२०   १८०९                   ७४८              २५०
५ मार्च २०२१         १८०३                   ३४८              १३८
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com