esakal | धक्कादायक घटना : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून केली हत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Buldana Crime News Husband strangles wife to death over suspicion

 साता जन्माच्या गाठी बांधून १९ वर्षाच्यापुर्वी विवाह बंधनात अडकत प्रेमाणे एकमेंकाचा विश्वास संपन्न करुन,जीवन जगत असताना अचानक मनात संशयाची पाल चुकचुकली. दारुच्या नशेत सुखी संसाराची राखरांगोळी करुन पाच उमळती, कोवळी मुंलांपैकी तीन अंपग मुली, अंध, बहिरी, लंगडी, आईविना पोरकी केली आहेत.

धक्कादायक घटना : चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा गळा आवळून केली हत्या

sakal_logo
By
संतोष अवसरमोल

घाटबोरी (मेहकर,जि.बुलडाणा) :   साता जन्माच्या गाठी बांधून १९ वर्षाच्यापुर्वी विवाह बंधनात अडकत प्रेमाणे एकमेंकाचा विश्वास संपन्न करुन,जीवन जगत असताना अचानक मनात संशयाची पाल चुकचुकली. दारुच्या नशेत सुखी संसाराची राखरांगोळी करुन पाच उमळती, कोवळी मुंलांपैकी तीन अंपग मुली, अंध, बहिरी, लंगडी, आईविना पोरकी केली आहेत.
दारूच्या नशेत कोण काय भूमिका दाखवेल हे सांगताच येत नाही. नशेमध्ये त्यांचे मनोबल एवढे वाढते की तो काही क्षणातच स्वतःला महाबलशाली समजू लागतो.अशावेळी तो एखादी चुकीची भूमिका करून बसतो.जर एखाद्या व्यक्तीस एखाद्या व्यसनाने जडले, तर खरोखरच त्याच्या संसाराचा वाटोळे झाल्याशिवाय राहत नाही. अशीच ह्रदय हेलावणारी चित्तथरारक घटना मेहकर तालुक्यातील शेलगांव देशमुख येथे घडलीय.

शेलगांव देशमुख येथील गणेश भिकाजी पहारे हा वाशिम जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यामधील डव्हाफाटा येथे काही वर्षांपासून टायर पंचर दुकान चालवत होता.पण कोरोनाच्या संकटात गेल्या ११ महिन्यांपासून आपली पत्नी नर्मदाबाई व चार मुली व एक मुलगा,सासु,आपल्या मुळ गावात शेलगांव देशमुख येथे राहत होती.

त्यामुळे पती गणेश पहारे हा अधुन मधुन शेलगांव देशमुख येथे आपल्या घरी पत्नीच्या भेटीला येत होता. पण गणेश पहारे हा व्यसनाधीन होत गेल्या दोन महिन्यांपासून दारुचे व्यसन जास्तच चढले होते, त्यामुळे पत्नी नर्मदाबाई गणेश पहारे हिच्या चारित्र्यावर पती गणेश पहारे नेहमी संशय घेऊन घरात भांडण झगडा होत असल्याने, गणेश पहारे यांने आपल्या पत्नीचा भाऊ  रवी सुखदेव सिमरे यास फोन वर नर्मदाबाईच्या चारित्र्याबद्ल माहिती दोन तीन वेळा दिली होती.   एक वेळ नर्मदाचा इंटरनेटवर फोटो आहे अशी माहिती दिली, तेव्हा रवी सिमरे यांनी आपल्या दाजी गणेश पहारे यांची समजुन काढून विनाकारण माझ्या बहिणीची बदनामी करु नका, अशी विनंती केली होती.

परंतु नर्मदाबाईचा दि.(२) रात्री आपल्या भाऊ रवी सिमरे यास फोन करुन सांगतले तु आईला माझ्या घरी उद्याला पाठव तुझे दाजी मला त्रास देऊन मारहाण करत आहेत. त्यानंतर दि.(३) च्या रात्री गणेश भिकाजी पहारे यांने आपली पत्नी नर्मदाबाई गणेश पहारे हिचा दारुच्या नशेत गळा आवळून हत्या केली.

त्यावेळी गणेश पहारे यांनी आपला साळा रवी सिमरे यास फोन वर माहिती दिली की तुझ्या बहिणीला हार्टअटक आला व मरण पावली. तेव्हा भाऊ रवी, कैलास,आई,शेलगांव देशमुख येथे नर्मदाबाईच्या अंतिम संस्कारासाठी आले.

त्यावेळी गावातील नातेवाईक व इतर लोकांनी नर्मदाबाईला शेवटच्या आंघोळ घालण्यासाठी घरातुन दारात आणले असताना नर्मदाबाईच्या चेहऱ्यावर गळ्यावर निशाण दिसून येते असल्याने घातपाताचा संशय आला.

मृत्यू झालेल्या नर्मदाबाईचा भाऊ रवी सिमरे यांनी दाजी गणेश पहारे यांना विचारपूस केली असता गणेश पहारे उडवाउडवीची उत्तरे देऊन पळून गेला. तेव्हा रवी सिमरे यांनी आपल्या बहिणीचा अंत्यसंस्कार रोखुन डोणगांव पोलीस स्टेशनमध्ये तोंडी रिपोर्ट दिला की माझी बहिण नर्मदाबाई हिचा दारुच्या नशेत गणेश भिकाजी पहारे यांनी गळा आवळून हत्या केली.

यावेळी ठाणेदार दिपक पवार यांनी गणेश पहारे यांचा शोध घेतला असता,फरार झालेला गणेश पहारे हा मालेगांव तालुक्यामधील डव्हाफाटा येथे मुसक्या आवळून जेरबंद करण्यात आले.  नर्मदाबाईचा वैद्यकीय अधिकारी यांचा अहवाल सुध्दा गळा आवळून हत्या असल्याचा असल्याने गणेश भिकाजी पहारे यांच्यावर कलम ३०२ नुसार गुन्हा डोणगांव पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला. 


पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, पोलीस उपअधीक्षक बंजरग बनसोडे, उपविभागीय अधिकारी विलास यमोवार, ठाणेदार दिपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी राठोड अधीक तपास करीत आहेत.बिटजमादार मोहन सावंत, पोलीस नाईक सुभाष मस्के, दिलीपराव राठोड, गजानन काकड, अशोक झोरे,सतीश मुळे,शेख अख्तर, विष्णु जायभाये, नितीन खराडे, विकास राऊत, पंढरीनाथ डोईफोडे,पवन गाभणे,वर्षा राठोड मॅडम या तपासात सहकार्य करीत आहेत.

अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

संपादन - विवेक मेतकर

अधिक वाचा - 

 

 

 

 

 

 

loading image