कोरोना योद्धा अन् बारामती शहर; बातमी नक्की वाचायलाच हवी

कोरोना योद्धा अन् बारामती शहर; बातमी नक्की वाचायलाच हवी

बारामती : कोरोनाने अनेक समीकरणे बदलली, काही ठिकाणी परस्परांविषयीची आपुलकी वाढली तर कोरोनाशी दोन हात करणा-या कोरोना योध्द्यांप्रती समाजातील सन्मानाची भावनाही वाढीस लागली. बारामतीतही एका कोरोना योध्द्यांकडून दुस-या कोरोनायोध्द्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक अनौपचारिक कार्यक्रम आज झाला. 

18 मार्च पासून सलगपणे कोरोनाशी दोन हात करण्यात सगळ्यात आघाडीवर असलेल्या बारामती नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना आज पोलिसांच्या वतीने चहापान व नाश्ता दिला गेला. कारण काहीही नव्हते, पण गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा छोटेखानी सोहळा झाला. 

उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलिस निरिक्षक औदुंबर पाटील, सहायक पोलिस निरिक्षक योगेश शेलार, फौजदार पद्मराज गंपले यांनी रस्त्यावर उतरुन काम करणा-या सर्वच आरोग्य विभागाच्या व नगरपालिकेच्या कायमस्वरुपी तसेच कंत्राटीही कर्मचा-यांशी आज सकाळी मनमोकळा संवाद साधला. 

पोलिसांप्रमाणेच तुम्हीही प्रत्यक्षपणे या संकटाच्या काळात समाजासाठी काम करता आहात, तुम्हीही स्वताःची आणि कुटुंबाची काळजी घ्यायला हवी, आरोग्यविषयक सर्व बाबींची माहिती इतरांनाही द्यावी, मास्कचा वापर, सॅनेटायझर्स व ग्लोव्हजचा वापर नियमित करावा या सूचना शिरगावकर व पाटील यांनी या वेळी दिल्या. तुम्ही जे काम करता आहात, त्याचा बारामतीकरांना अभिमान वाटतो, अशा शब्दात त्यांच्या पाठीवर पोलिसांनी कौतुकाची थाप मारली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अचानकच वरिष्ठ पोलिस अधिका-यांकडून मिळालेल्या या शाबासकीमुळे आरोग्य विभागाचे कर्मचारीही भारावून गेले होते. आपण केलेल्या कामाची दखल घेतली गेली याचा त्यांना झालेला आनंद त्यांच्या चेह-यावर जाणवत होता. नगरपालिकेचे आरोग्य निरिक्षक राजेंद्र सोनवणे यांनी पोलिसांचे या प्रसंगी या प्रोत्साहनाबद्दल आभार व्यक्त केले. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com