उद्धवजी, एवढी काटकसर बरी नव्हे, कोरोना यौद्ध्यांना जेवण द्या; शहर भाजपची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

उद्धवजी, एवढी काटकसर बरी नव्हे!.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा सवाल करत, कोरोना प्रतिबंधासाठी अहोरात्र झटणाऱ्या ससून रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सेसना पुर्वीप्रमाणे निवास आणि भोजनाची मोफत सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी पुणे शहर भाजपच्यावतीने आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.

पुणे - उद्धवजी, एवढी काटकसर बरी नव्हे!.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा सवाल करत, कोरोना प्रतिबंधासाठी अहोरात्र झटणाऱ्या ससून रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सेसना पुर्वीप्रमाणे निवास आणि भोजनाची मोफत सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी पुणे शहर भाजपच्यावतीने आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने आज (ता. ३)  ससून रुग्णालयातील अधिष्ठाता कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना भोजनाची पाकिटे वाटप करण्यात आली. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

मुलीला भेटायचे तरी कसे? वडिलांसमोर प्रश्न; एकतर्फी आदेश थांबल्याने वाढली अडवणूक

या आंदोलनात  गणेश घोष, दत्तात्रेय खाडे, राजेश येनपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर, महिला मोर्चा अध्यक्षा अर्चना पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर, युवती अध्यक्षा निवेदिता एकबोटे, झोपडपट्टी आघाडी अध्यक्ष विशाल पवार आदी सहभागी झाले होते.  यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सरकार अकार्यक्षम, असंवेदनशील असून सरकारकडून पुणे शहराला सापत्न वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. यावेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

पुण्यातील जम्बोची कमाल! ३१ दिवस ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवरील महिला अखेर कोरोनामुक्त !

कोरोनाच्या महामारीत गेल्या सहा महिन्यांपासून ससून रुग्णालयातील कोरोना कक्षात डॉक्टर, नर्स आणि कर्मचारी काम करत आहेत. हे सर्वजण गंभीर कोरोना रुग्णांवर उपचार करत असतात. त्यामुळे त्यांना  संसर्ग होण्याची भीती जास्त असते. त्यांच्यामुळे कुटुंबावरही भीतीचे सावट असते. म्हणून या कर्मचाऱ्यांच्या निवासाची आणि भोजनाची मोफत व्यवस्था होणे आवश्यक आहे. परंतू निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करत, ही व्यवस्था करता येत नसल्याची ससून रुग्णालय व राज्य सरकारनची भूमिका चुकीची आणि निषेधार्थ आहे. त्यामुळे ही सुविधा पुर्ववत करा. अन्यथा भारतीय जनता पक्षाला आंदोलन करावे लागेल, असा इशारा मुळीक यांनी दिला. 

लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या लस कोरोनावर ठरतायेत उपयुक्त? पुण्यात बीसीजी लसीवर होणार संशोधन

कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्सेसमुळे त्यांचे कुटुंबिय आणि इतरांना संसर्ग होऊ नये, या उद्देशाने ड्युटीच्या कालावधीत् त्यांची राहण्याची व्यवस्था ससून रुग्णालय परिसरातील विविध हॉटेलमध्ये करण्यात आली होती. परंतू सरकारने या हॉटेलचे बिल भरले नाही. त्यामुळे हॉटेलचालकांनी हॉटेल देण्यास नकार दिला असल्याचा आरोप मुळीक यांनी कला.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Warrior Food Issue Agitation BJP Uddhav Thackeray