चंद्रकांत पाटील म्हणतात, ' कारगिल आणि कोरोना योद्धे यांच्यात साम्य'

chandrakant-patil
chandrakant-patil

पुणे - कारगिल युद्धात विजय मिळावा यासाठी शत्रूशी प्राणपणाने आपले सैनिक लढले. कोरोना विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी कोरोना योद्धे प्राणपणाने लढत आहेत. देशासाठी, समाजासाठी स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता लढत राहणे, हेच कारगिल आणि कोरोना योद्धा यांच्यातले साम्य आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. 

सरहद संस्थेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या निमित्ताने तसेच कारगिल विजय दिवसाला  आज (26 जुलै) 21 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त कोरोनाशी लढून हजारोंचे प्राण वाचवणाऱ्या पुणे शहरातल्या कोरोना योद्ध्यांना कारगिल गौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. कात्रज येथील सरहद संस्थेत झालेल्या या कार्यक्रमात भाजपचे प्रदेश सचिव राजेश पांडे, सरहद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे संयोजक संजीव शहा, निखिल शहा, वंदे मातरम संघटनेचे प्रदेश अध्यक्ष वैभव वाघ, शैलेश वाडेकर आदी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वंदे मातरम् संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन जामगे, कोरोना योद्धा डॉ. अमोल देवळेकर, डॉ. दीपा अमोल देवळेकर यांना कारगिल गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच लॉकडाऊन काळात 500 लोकांचे प्राण वाचवण्यास कारणीभूत ठरलेल्या 108 आपत्कालीन ॲम्ब्युलन्स सेवेचे चालक तेजस कराळे, सुशील कराळे आणि विकास काजळे यांचा ‘कारगिल विशेष सन्मान’ देऊन गौरवण्यात आले.

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘'कोरोनाची लढाईत शत्रू दिसत नाही, पण तरीही हल्ले होत असतात. त्यामुळेच या लढाईत जास्त सतर्क राहावे लागते. कोरोना योद्धांमुळे कोरोना विरोधातील लढाई लढता येत आहे. त्यांचा योग्य तो सन्मान होणे आवश्यक आहे. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कारगिल विजय दिवसाचे औचित्य उचित आहे."

संजीव शहा म्हणाले, "कारगिल येथील नागरिक पूर्णपणे भारतप्रेमी आहे. तिथे पर्यटनासाठी असंख्य ठिकाणे आहेत. या भूमीला आता‌ केवळ युद्धभूमी समजणे योग्य नाही. तेथील नागरिकांशी अन्य भारतीयांना जोडण्यासाठी आम्ही कारगिल मॅरेथॉनचे आयोजन करतो. कोरोनामुळे या वर्षी मॅरेथॉन झाली नाही. पण पुढील वर्षी निश्चितपणे त्याचे आयोजन केले जाईल.

नहार म्हणाले, "सरहद संस्था तीन वर्षांपासून कारगिल आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आयोजन करते. देशातील विविध भागांतील लोकांना कारगिलशी जोडावेे यासाठी ही मॅरेथॉन सुरू करण्यात आली. त्यामुळे त्या भागात अलीकडच्या काळात पर्यटन वाढल्याचेही दिसून आले आहे."

सचिन जामगे यांनी,  लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर गोरगरीब, निराधार लोकांना कशा प्रकारे मदत केली याची माहिती दिली. डॉ. देवळेकर यांनी कोरोनाग्रस्तांना उपचार करताना आलेले अनुभव सांगितले. रुग्णांवर उपचार करता करता ते स्वतः करोनाबाधित झाले. तरीही न डगमगता ते त्यातून बाहेर येत पुन्हा रुग्णसेवेसाठी सज्ज झाले. तेजस कराळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

(Edited by : Kalyan Bhalerao)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com