
अण्णापूर हे शिरूर शहरापासून अवघे सहा किलोमीटरवरील छोटेसे गाव असून, तेथील लोकांची शिरूरला विविध कामानिमीत्त दैनंदिन ये जा चालू असते.
शिरूर शहरावर कोरोनाच्या धोक्याची टांगती तलवार
शिरूर (पुणे) : शिरूर शहरापासून जवळच असलेल्या आणि गेल्या काही दिवसांपासून शहरातीलच एका खासगी दवाखान्यात उपचार घेत असलेल्या 52 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचे आज स्पष्ट झाले. गेल्या काही दिवसांपासून या व्यक्तीच्या घरी ठाणे येथून काही पाहुणे राहायला आले होते. त्यांच्यापासूनच हा संसर्ग झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाने वर्तविला आहे.
मुंबईहून जुन्नरमध्ये येताय तर...
या बाधित व्यक्तीला उपचारासाठी पुण्यातील केईएम रूग्णालयात हलविले असून, त्याच्या संपर्कातील व्यक्तींबरोबरच; ते ज्या दवाखान्यात उपचारासाठी येत होते, तेथील 14 जणांना क्वारंटाइन केले आहे.
बारामतीत हाॅटेलला परवानगी न मिळाल्यास
डोके दुखत असल्याने सोमवारी (ता. 25) हा व्यक्ती शहरातील एका खासगी दवाखान्यात आला होता. तेथील तपासणी व उपचारानंतर तो पुन्हा अण्णापूरला गेला, परंतु डोकेदुखी न थांबल्याने गुरूवारी (ता. 28) परत तपासणीसाठी आला. तेव्हा येथीलच एका खासगी लॅबमधून त्याचा एक्स रे काढला असता न्यूमोनियासदृश लक्षणे दिसून आली. त्यामुळे त्याला तातडीने पुण्यातील एका खासगी रूग्णालयात हलविले. तेथे उपचारादरम्यान त्याची कोरोना टेस्ट केली. त्याबाबतचा अहवाल आज प्राप्त झाला असून, तो पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी दिली.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अण्णापूर हे शिरूर शहरापासून अवघे सहा किलोमीटरवरील छोटेसे गाव असून, तेथील लोकांची शिरूरला विविध कामानिमीत्त दैनंदिन ये जा चालू असते. शिवाय बाधित व्यक्तीवर शहरातीलच एका रूग्णालयात उपचार झाल्याने व त्याचा एक्स रेदेखील येथील एका लॅबमधून काढल्याने शहरातही चिंतेचे वातावरण पसरले आहे. हा दवाखाना व लॅब आज बंद करण्यात आली.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
संबंधित व्यक्तीच्या घरी गेल्या आठ- दहा दिवसांपूर्वी ठाणे येथून काही पाहुणे राहायला आले होते. त्यांना होम क्वारंटाइन' करणे गरजेचे असताना आणि त्याबाबत स्थानिकांनी तक्रारी करूनही प्रशासकीय पातळीवर दुर्लक्ष झाल्याने तरूण कार्यकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
ठाण्याच्या पाहुण्यांपैकी कुणाला तरी बाधा झाल्यानेच संसर्ग झाला, असे सांगण्यात येत असले; तरी नेमके कोण बाधित होते, हे सर्वांच्या तपासणीतूनच स्पष्ट होईल, असे आरोग्य विभागाने कळविले आहे. त्यांचे; तसेच बाधित व्यक्तीचा गावातील ज्यांच्याशी संपर्क आला होता त्यांचे आणि शिरूरमधील खासगी दवाखान्यातील डॉक्टर, तेथील कर्मचारी, खासगी लॅबचालक यांचेही स्वॅबचे नमूने तपासणीसाठी पाठविले असून, उद्या त्यांचा अहवाल येईल, असे आरोग्य विभागाने कळविले आहे.