दौंडमधील या कुटुंबातील सहा जणांचे कोरोनाचे रिपोर्ट...

सावता नवले
Tuesday, 14 July 2020

दौंड तालुक्यातील मळद येथे सापडलेल्या कोरोना रुग्णांच्या कुटुंबातील इतर सहा जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले. 

कुरकुंभ (पुणे) : दौंड तालुक्यातील मळद येथे सापडलेल्या कोरोना रुग्णांच्या कुटुंबातील इतर सहा जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती रावणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुराधा बोऱ्हाडे यांनी दिली.

अमोल कोल्हे यांच्या पंचसूत्रीचे पालन करा...कोरोनाला दूर रोखा...

मळद येथील 58 वर्षीय महिलेला व त्यांच्या मुलाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या कुटुंबातील आणखी सहा जणांचे स्वामी चिंचोली (ता. दौंड) येथील कोविड सेंटरमध्ये घशातील नमुने रविवारी (ता.  12) तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा अहवाल सोमवारी (ता. 13) उशिरा प्राप्त झाला. कोरोना रुग्णांच्या कुटुंबातील या सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह दोन्ही रुग्ण पुण्यातील नवले हाॅस्पिटल येथे उपचार घेत आहेत. कोरोनाची लागण झालेल्या तरुणाच्या संपर्कातील आणखी दोन जणांचे घशातील नमुने तपासणीसाठी देण्यात आले आहेत. या रुग्णाच्या संपर्कात असलेल्या ग्रामस्थांनी घरीच राहून सरकारने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे.  तसेच, रावणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुराधा बोऱ्हाडे व मळदचे सरपंच दत्तात्रेय शेलार यांनी केले आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या महिलेला काही दिवसांपूर्वी कर्करोगाच्या तपासणीसाठी पुण्यातील रुबी हाॅल क्लिनिक गेल्या होत्या. त्यानंतर ऑपरेशनसाठी त्यांना पुण्यातीलच नवले हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांच्या एका मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, कुटुंबातील इतर सहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे मळद ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona's report of six members of the same family in Daund was negative