esakal | कोरोनाचा काळ महिला डॉक्टरांसाठी आव्हानात्मक
sakal

बोलून बातमी शोधा

Doctors

कोरोनाचा काळ महिला डॉक्टरांसाठी आव्हानात्मक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोरोनामुळे (Corona) रूग्णालयात (Hospital) वाढलेले काम, लॉकडाउनची बंधने, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि मुलांचे संगोपन अशा वेगवेगळ्या पातळीवर लढणाऱ्या महिला डॉक्टरांना (Women Doctor) हा काळात सर्वाधिक आव्हानात्मक होता. पुरुष डॉक्टरांच्या तुलनेत त्यांना अधिकच्या तानतनावाला सामोरे जावे लागले. महिला डॉक्टरांवरील दीर्घकालीन परिणामांचा (Effect) विचार करता कुटुंबाने आणि समाजाने त्यांना पूरक साहाय्य करण्याची गरज, मुंबईतील होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूटच्या टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या संशोधकांनी व्यक्त केली आहे. (Coronas Time is Challenging for Female Doctors)

भारतीय डॉक्टरांवर कोरोनाच्या साथीमुळे झालेला परिणामावर इन्स्टिट्यूटचे डॉ. सबिता जीवनानी, डॉ. प्रिया रंगनाथन, डॉ. वीरेंद्र तिवारी, डॉ. अपूर्वा अशोक, डॉ. देवयानी नियोगी, डॉ.जॉर्ज करीमुंडॅकल आणि डॉ.सी.एस.प्रमेश यांनी संशोधन केले आहे. अमेरिकन सोसायटी फॉर क्लिनिकल ऑन्कॉलॉजीमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. देशभरातील एक हजार ४१ डॉक्टरांच्या सर्वेक्षणातून काही निष्कर्ष समोर आले आहे. सुमारे ९० टक्के महिला डॉक्टरांवर लॉकडाउनच्या काळात घरगुती जबाबदाऱ्या वाढल्याचे समोर आले आहे. कोरोना साथीची भिषणतेत कुटुंबाचा संरक्षण आणि डॉक्टर म्हणून आपले कर्तव्य या दुहेरी आव्हानात्मक स्थितीत त्यांना तारेवरची कसरत करावी लागली.

हेही वाचा: "महाराष्ट्र धर्म महत्वाचा, इथं 'लव्ह जिहाद'ला थारा नाही"

सर्वेक्षणाचे निष्कर्ष -

- लॉकडाउनमुळे महिला डॉक्टरांवर मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी वाढली

- कुटुंबातील सर्वच घरी असल्याने त्यांच्या स्वयंपाकाचा अधिक तान

- महिला डॉक्टरांच्या कामावर नकारात्मक परिणाम पडला

- कुटुंबाकडून काम सोडण्यासाठी दबाव

सर्वेक्षणात सहभागी डॉक्टर (टक्केवारीत)

लिंग वय ३१ ते४० वय ४१ ते ५० अन्य वयोगट

१) पुरुष ३९.३ ३१.६ २९.१

२) महिला ३७.२ ३२.८ ३०

कोरोनाचा परिणाम (आकडे टक्क्यांमध्ये)

तपशील पुरूष स्त्री

१) लॉकडाउनमुळे घरातील जबाबदाऱ्या वाढल्या ४५ ५५

२) घरातील कामाची जबाबदारी ३८ ६२

३) मुलांच्या संगोपनाची जबाबदारी ८ ९२

४) मुलांच्या अभ्यासाची जबाबदारी ७ ९३

५) साथीदाराकडून सुट्टी घेण्याचा आग्रह ६३ ३७

६) नोकरी सोडण्याचा दबाव ३० ७०

७) कामावर होणारा नकारात्मक परिणाम ४० ६०

कोरोनाच्या काळात पुरुष आणि स्त्री दोन्ही डॉक्टरांवर घरगुती कामांची जबाबदारी वाढली. पण विशेष करून महिलांवर कुटुंबाच्या पालनपोषणाबरोबरच मुलांच्या शिक्षणाचीही अतिरिक्त जबाबदारी असते. अशा वेळी कुटुंबाने आणि समाजाने त्यांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.

- डॉ. सी.एस. परमेश, संचालक, टाटा मेमोरिअल हॉस्पिटल

loading image