esakal | महाराष्ट्र धर्म महत्वाचा, इथं 'लव्ह जिहाद'ला थारा नाही - उर्मिला मातोंडकर
sakal

बोलून बातमी शोधा

Actress Urmila Matondkar

"महाराष्ट्र धर्म महत्वाचा, इथं 'लव्ह जिहाद'ला थारा नाही"

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

पुण्यात नकुत्याच चर्चेत आलेल्या कथीत 'लव्ह जिहाद' प्रकरणी अर्थात हिंदू-मुस्लीम विवाह इच्छुक जोडप्याला आणि त्यांच्या कुटुंबियांना आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्र धर्म महत्वाचा इथे लव्ह जिहादला थारा नाही, असं मातोंडकर यांनी म्हटलं आहे. (Maharashtra religion is important Love Jihad has no place here says Urmila Matondkar)

हेही वाचा: "संजय राऊत रॉकस्टार"; उर्मिला मातोंडकर यांच्याकडून कौतूक

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला पुण्यातून उर्मिला मातोंडकर यांच्या हस्ते सुरुवात झाली. यावेळी आयोजित कार्यक्रमात पत्रकारांशी त्यांनी विविध मुद्द्यांवर संवाद साधला. दरम्यान, पुण्यात एका आंतरधर्मीय लग्नाची चर्चा सुरू असून लग्न करु इच्छिणाऱ्या मुस्लिम तरुण आणि हिंदू तरुणीला धमक्या येऊ लागलेल्या आहेत. त्यावरून राज्यात पुन्हा एकदा कथीत 'लव्ह जिहाद'ची चर्चा सुरू झाली आहे. यावर बोलताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, "महाराष्ट्र राज्यात 'महाराष्ट्र धर्म' महत्वाचा आहे. आजतागायत आपण 'लव्ह जिहाद'ला इथं थारा दिलेला नाही. कुठल्याही प्रकारची बळजबरी चुकीची आहे. हिंदू-मुस्लिम विवाहांकडे एकांगी बाजूने पाहत काही लोक राजकीय किंवा सामाजिक स्वार्थासाठी काम करत असतील तर ते चुकीचे आहे. त्यामुळे वस्तुस्थिती काय आहे ते समजून घेऊन अन्यायाला वाचा फोडायला हवी"

"राज्यपालांनी यादी मंजूर केली नाहीतरी कामं थांबत नाही"

ठाकरे सरकारने शिफारस केलेल्या १२ सदस्यांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर करून सात महिने उलटले, तरीही अद्याप नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष निर्माण सुरु आहे. याबाबत बोलताना, मातोंडकर म्हणाल्या'' राज्यपाल कोश्यारी जेव्हा यादी मंजूर करतील तेव्हा करतील त्यामुळे काही काम थांबत नाही. नेते मंडळी एक फळ देतात चार फोटो काढतात. काही नेते गदारोळ करतात, त्यांना करू द्यावा. तसेच नेते मंडळी मूळमुद्दे सोडून दिवसभर कॅमेऱ्यासमोर येत असतात''

दरम्यान, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात गोंधळ अन् राडा झाला या प्रकाराबाबत बोलताना मातोंडकर म्हणाल्या, "जे घडलं ते चुकीचं घडलं. केंद्रांत वेगळे आणि राज्यात वेगळे असे नियम आहे का हे नेते मंडळींनी स्पष्ट करावं''

loading image