esakal | पुणे : प्रवास करणार असाल तर, तुम्हाला पास लागणारच; वाचा सविस्तर बातमी 
sakal

बोलून बातमी शोधा

coronaviru lockdown pune travel police pass mandatory

पुणे शहरात अद्याप नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात आलेली नाही. पुणे जिल्हा आणि परिसरात बारामती, इंदापूर, वालचंदनगर याच ठिकाणी एसटी सुरू आहे.

पुणे : प्रवास करणार असाल तर, तुम्हाला पास लागणारच; वाचा सविस्तर बातमी 

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : कोरोना व्हायरसनं सगळं जग जागच्या जागी थांबलं. पण, एका ठिकाणी थांबला तो माणूस कसला? पोटाची खळगी भरण्यासाठी त्याला अनेकदा गाव सोडावा लागतो. लॉकडाउनमुळं सगळ्यात जास्त गैरसोय झाली ती या चाकरमान्यांची. देशात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउमध्ये टप्प्या टप्प्याने बदल करण्यात आले. आता पाचवा लॉकडाउन सुरू झाला असला तरी तो पहिल्या लॉकडाउनच्या तुलनेत वेगळा आहे. 

पुण्यात काय होणार?
लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यामध्ये विविध नियम शिथिल करण्यात आले आहेत.  मात्र, पुणे जिल्हा अंतर्गत, पुण्याबाहेर किंवा पुण्यात येण्यासाठी पोलिस पास गरजेचा असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

आणखी वाचा - पालकमंत्री अजित पवारांविषयी गिरीष बापट म्हणाले....

पुण्यात वाहतूक सुरू पण...
 पुणे शहरात अद्याप नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू करण्यात आलेली नाही. पुणे जिल्हा आणि परिसरात बारामती, इंदापूर, वालचंदनगर याच ठिकाणी एसटी सुरू आहे. यामुळे नागरिकांना प्रवास करण्यासाठी कोणतीही सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नाही. पर्यायाने नागरिकांना खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे. अशावेळी प्रतिबंधित क्षेत्रांमधील नागरिक इतरत्र प्रवास करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू शकतो. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत पुण्यातील प्रवासासाठी पास काढणे गरजेचे आहे. पास कोणत्या कारणासाठी काढण्यात येत आहे तसेच संबंधित वाहनातून किती प्रवासी प्रवास करणार आहे. याबाबत पूर्वी असलेले नियम कायम राहणार आहेत, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.

आणखी वाचा - बंगाली मजूर आणि पुण्या मुंबईचं नातं माहिती आहे?

पुण्यात येण्यासाठी किंवा इकडून बाहेर जाण्यासाठी अद्याप पूर्णतः वाहतूक खुली करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवासाबाबत पूर्वीचे जे नियम आहेत तेच पुढील आदेश येईपर्यंत कायम असणार आहेत. आत्तादेखील पास मिळण्यासाठी अनेक अर्ज आलेले आहेत. छाननी करून त्यांना मंजुरी देण्यात येत आहे.
बच्चन सिंग, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा
 

loading image
go to top