धक्कादायक : पुण्यात बंदोबस्तासाठी आलेल्या जवानांनाच कोरोना; वाचा सविस्तर बातमी

टीम ई-सकाळ
मंगळवार, 26 मे 2020

रामटेकडी येथील एसआरपीएफ' क्रमांक दोनची एक कंपनी बंदोबस्ताच्या कामानिमित्त बाहेर गावी गेली होती.

पुणे : राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) एका कंपनीतील २० जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर अजुन 33 जवानांचे अहवाल येणे आहेत. तसेच संसर्ग झालेल्या जवानांच्या संपर्कात आलेल्याना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा

रामटेकडी येथील एसआरपीएफ' क्रमांक दोनची एक कंपनी बंदोबस्ताच्या कामानिमित्त बाहेर गावी गेली होती. बंदोबस्त पूर्ण केल्यानंतर संबंधित कंपनी १९ मे पुण्यात आली होती. त्यानंतर २१ मे रोजी काही जवानांना कोरोनाची लक्षणे निदर्शनास आली. त्यामुळे कंपनीतील २० जणांच्या घशातील नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी सहा जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर मंगळवारी आणखी १४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांवर एका खासगी रुग्णलयात उपचार सुरू आहेत. संबंधित जवानांच्या संपर्कात आलेल्या सर्व जवानांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सध्या ३३ जणांचे अहवाल येणे बाकी आहे.

आणखी वाचा - लोहगाव एअरपोर्ट झालंय बिझी!

आणखी वाचा - पुण्यातल्या 400 कोरोनाग्रस्तांविषयी महत्त्वाचे अपडेट

दरम्यान, पुण्यातील चौकात चौकांमध्ये बंदोबस्तासाठी उभ्या असणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाची लागण झाली आहे. ससून रुग्णालयाच्या बालरोग विभागाने केलेल्या सर्वेक्षणात पुण्यातील पोलिसांना कोरोना विषयी योग्य माहिती असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळं योग काळजी घेण्यात येत असल्याने पोलिसांना कोरोनाचा धोका कमी असल्याचे मानले जाते. पण, त्यातूनही काही जणांना कोरोनाची लागण झाली. त्यात एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यूही झाला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus 20 srpf jawans get affected 33 reports still waiting