Coronavirus: एसी डब्यांचे तापमान २५ अंश

Coronavirus: एसी डब्यांचे तापमान २५ अंश

पुणे - ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर मध्य रेल्वेच्या गाड्यांमध्ये वातानुकूलन यंत्रणा (एसी) २५ अंश सेल्सिअस ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच, या रेल्वे गाड्यांतील पडदे, ब्लॅंकेट आणि बेडशीटही काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. येत्या ८ ते १० दिवसांत नवी व्यवस्था कार्यान्वित होणार आहे. तोपर्यंत प्रवाशांना स्वतःच त्याची व्यवस्था करावी लागणार आहे.

रेल्वेच्या डब्यांमधील पडदे, ब्लॅंकेट्‌स आणि बेडशीट काढून टाकण्यास दोन दिवसांपासून सुरुवात झाली आहे. मुंबई-दिल्ली राजधानी एक्‍स्प्रेस, पुणे-पाटणा एक्‍स्प्रेस, पुणे-जम्मूतावी झेलम एक्‍स्प्रेस आदी गाड्यांचा त्यात समावेश आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी या उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली. 

मध्ये रेल्वेच्या पुणे आणि मुंबईतून सुटणाऱ्या सर्व गाड्यांमधील ब्लॅंकेट्‌स, बेडशीट, उशा बदलण्यात येत आहेत. त्याचे नवे संच येईपर्यंत प्रवाशांना स्वतःच ही व्यवस्था करावी लागणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ‘एसी’ गाड्यांतील पडदेही काढून टाकण्यात येत आहेत. ‘एसी’ची पातळी २५ अंश सेल्सिअसवर स्थिर केल्यामुळे प्रवाशांना ब्लॅंकेट, बेडशीटची आवश्‍यकता भासणार नाही. आपत्कालीन परिस्थितीत ज्या प्रवाशांना गरज भासेल अशांना ही साधने देण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. जुनी ब्लॅंकेट, बेडशीट उच्च तापमान असलेल्या लाँड्रीमध्ये पाठविण्यात येणार आहेत. त्यांचे निर्जंतुकीकरण झाल्यावर त्यांचा पुन्हा वापर करण्यात येईल, अशी माहिती सुतार यांनी दिली. 

स्थानकांची तीनदा स्वच्छता
मध्य रेल्वेच्या अखत्यारीतील सर्व स्थानकांवर दिवसांतून तीनवेळा स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. स्वच्छतागृहांतही फिनेलचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. तिकीट खिडकीवर गरजेनुसार सॅनिटायझर ठेवले आहे. 

पुणे-मुंबईतून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांतील ब्लॅंकेट, बेडशीट आणि उशा काढल्या असून, पडदेही हटविले आहेत. सुमारे १० दिवसांत बेडरोलचे नवे संच येतील तोपर्यंत प्रवाशांनी सहकार्य करावे. 
- शिवाजी सुतार, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com