आषाढी वारी संदर्भात महत्त्वाचं अपडेट; चोपदारांनी सूचवला पर्याय

coronavirus ashadhi wari update marathi information
coronavirus ashadhi wari update marathi information

आळंदी (पुणे) : पंढरपुरातील स्थानिकांची आणि वारकऱयांच्या आरोग्याची काळजी घेऊन संत ज्ञानेश्वर महाराजांच्या यंदाच्या आषाढी वारीचा पायी सोहळा नियंत्रित वारकऱयांना घेऊन करण्याचा पर्याय सोहळ्याचे मानकरी राजाभाऊ चोपदार आणि रामभाऊ चोपदार यांनी आळंदी देवस्थान आणि सरकारकडे दिला आहे. दरम्यान, वारीच्या स्वरुपाबाबतचा अंतिम निर्णय सरकारने घ्यावा, असेही त्यांनी म्हटले आहे.

पुण्यातल्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

आळंदी देवस्थानने आषाढी वारीचा सोहळा यंदा कशा स्वरूपात न्यायचा याबाबत दिंडीकरी-फडकरी वारकऱयांकडून सूचना मागविल्या होत्या. याबाबत नुकतीच आळंदी देवस्थानची व्हिडीओ कॉन्फरन्सही झाली. मात्र, सरकारकडे अद्याप विचारविनिमय सुरू आहे. त्यासंदर्भांत चोपदार यांनी निवेदनाद्वारे वारीच्या स्वरुपाबाबत पर्याय दिला आहे. विभागीय आयुक्त, देवस्थानला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आळंदीतून परंपरेप्रमाणे ज्येष्ठ वद्य अष्टमीला म्हणजे 13 जूनला प्रस्थान करून पहिल्या सात दिवस पालखी आळंदीतच राहील. त्यानंतरच्या आठवड्यात सोहळा पायी वारी सुरू करेल. त्यात दररोज पहाटे ते दुपारपर्यंत पंधरा तर सायंकाळी दहा दिवसभरात एकूण पंचवीस किलोमीटरची पायी वाटचाल करू शकतात. कमीत कमी दिवसांत होणाऱया सोहळ्यामुळे सरकारी यंत्रणेवर ताण कमी राहील. सरकारने सोहळ्याच्या पालखी काळात संबंधित गाव लॅाकडाउन ठेवावे. आवश्यकता वाटल्यास रथ, पालखी, घोडे असा लवाजमा टाळून पादुका डोक्यावर घेऊन प्रवास केला जाऊ शकतो का? याचाही विचार करावा. प्रत्येक गावांमध्ये निर्धारित केलेले दोनच प्रतिनिधी सर्व गावाच्या वतीने दर्शन घेतील.

पुण्यातल्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

वयोमर्यादा असावी
सरकारकडून निश्चित केल्या जाणाऱ्या वारकऱ्यांची वयोमर्यादा साठ असावी, त्यांची कोरोना चाचणी केलेली असावी. सोहळ्याचा मुक्काम गावठाणात न करता मोकळ्या माळरानावर करावा. या वर्षीपुरते रिंगण सोहळे रद्द करून तेथील ठिकाणी परंपरेप्रमाणे सोपस्कार औपचारिक पूर्ण करावेत. वाखरीत वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून मगच पंढरपूरमध्ये प्रवेश द्यावा.सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने वारीचे स्वरूप निश्चित करावे, ते सर्वांना मान्य असेल. यंदा वारीत पायी संधी मिळणाऱया वारकरी हे आपले प्रतिनिधी समजून संप्रदायाने सहकार्य करावे. वारीच्या वाटेवरील गावातील ग्रामस्थांनी दर्शनाचा अट्टहास करू नये, असे आवाहनही राजाभाऊ चोपदार आणि रामभाऊ चोपदार यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com