Coronavirus : बारामतीकरांच्या मदतीसाठी कोरोना हेल्पलाईन सुरु.....

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 April 2020

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये निर्माण झालेले समज गैरसमज दूर करुन विश्वासाचे वातावरण तयार करण्यासाठी बारामतीत कोरोना हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.

बारामती - कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये निर्माण झालेले समज गैरसमज दूर करुन विश्वासाचे वातावरण तयार करण्यासाठी बारामतीत कोरोना हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. प्रशासन व लोकसहभागातून हा अभिनव उपक्रम प्रथमच बारामतीत सुरु झाला आहे. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बारामती पोलिस विभाग, बारामती सायकल क्लब, आपत्कालिन व्यवस्थापन समिती, इंडीयन मेडीकल असोसिएशन व मेडीकोज गिल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. 

कोरोनामुळे 21 दिवसांचा लॉकडाऊन झाल्याने लोकात संभ्रमाचे वातावरण आहे, तसेच काही जणांना निराशा तसेच मानसिक अस्वास्थ्य निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनातील समज गैरसमज दूर करुन शंकाचे निवारण करणे हा या हेल्पलाईनचा उद्देश आहे.

पुणेकरांनो चिंता करू नका; शहराला पुरेल इतका भाजीपाला उपलब्ध

उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, बारामती सायकल क्लबचे प्रमुख अँड. श्रीनिवास वायकर व डॉ. सुजित अडसूळ यांच्या संकल्पनेतून ही हेल्पलाईन तयार करण्यात आली आहे. 

या हेल्पलाईनमध्ये तीस मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. स्त्री पुरुष अशा दोघांचेही क्रमांक यात असल्याने महिला महिलांशी तर पुरुष पुरुषांशी संपर्क साधून शंकासमाधान करुन घेतील. 

या लॉकडाऊनच्या काळात अनेकांना काही मदतीचीही गरज असते, तसेच काही तातडीची सेवा उपलब्ध करुन हवी असते, या माध्यमातून प्रशासन व लोकांमधील दुवा बनण्याचे काम ही हेल्पलाईन करणार आहे. हा समाजप्रबोधन करण्याचा एक प्रयोग असून याचा वापर न्यायवैद्यक कारणांसाठी करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Coronavirus baramati started helpline for citizens