आरेच्या दुधाच्या टेम्पोत बियरच्या बाटल्या; पोलिसांनी अशी पकडली तस्करी!

coronavirus beer smuggling milk tanker pune police
coronavirus beer smuggling milk tanker pune police

पुणे Coronavirus : आत्तापर्यंत तुम्ही दारू गांजा यांच्या चोरून विक्रीचे अनेक प्रकार तुम्ही पाहिले असतील, पण हा प्रकार मात्र तुम्हाला "किक" बसल्याशिवाय राहणार नाही. एका दुधाच्या टेम्पो चालकाने चक्क दुधाच्या टेम्पोत क्रेटच्या मागे बियरच्या बाटल्या लपवून विक्रीसाठी नेत होता. मात्र, नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांनी त्याची चौकशी करून दुधाच्या टेम्पोत असलेल्या २९ हजार रुपयांच्या बियरच्या बाटल्या जप्त केल्या आणि चालकाला बेड्या ठोकल्या.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासााठी येथे ►  क्लिक करा 

महापालिकेच्या मृत कर्मचाऱ्याची कपडे घालून गांजा विक्री करीत असल्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी पुढे आला. इथे मात्र, त्या प्रकारवरही कळस चढविण्यात आला. तो प्रकार म्हणजे, चक्क दुधाच्या टेम्पोमधून बियरच्या बाटल्या विक्रीसाठी घेऊन जाण्याचा. घडले असे की, संचारबंदी काळात अत्यावश्यक सेवा म्हणून दुधाच्या टँकरला पोलिसांकडून अडविले जात नाही. मात्र, त्याचाच गैरफायदा घेत एका दूध टेम्पोमध्ये दुधाच्या क्रेटखाली चक्क बिअरच्या बाटल्या चोरून विक्रीसाठी घेऊन जात असल्याचा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. 

सोमवारी रात्री अकरा ते मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलिस कात्रज घाट येथे नाकाबंदी नाक्यांवर वाहनांची तपासणी करीत होते.  पोलिस कर्मचारी पारखी, तोंडे, भिंगारे असे १० जण नाक्यांवर वाहनांची तपासणी करीत होते. त्यावेळी एक दुधाचा टेम्पो (एम एच १२ जे एफ ६९८८) नाक्यांवर थांबला. पोलिसांनी चालकास विचारणा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी चालक उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी टेम्पो बाजूला घेऊन आतमध्ये तपासणी केली. त्यावेळी पोलिसाना दुधाच्या क्रेटमागे २८ हजार ८०० रुपये किंमतीचे बियरचे 12 बॉक्स मिळाले. पोलिसांनी टेम्पो, बियरच्या बाटल्या जप्त करून चालकास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com