esakal | Coronavirus:  "को-वर्किंग प्लेस' बंद 

बोलून बातमी शोधा

Coronavirus:  "को-वर्किंग प्लेस' बंद 

राज्यात कोरोना संसर्गामुळे मोठ्या कंपन्या आणि उद्योग बंद असून, याचा परिणाम "को-वर्किंग प्लेस'वरही झाला आहे. प्रशासनाने काढलेल्या आदेशानंतर शहरातील बहुतेक "को-वर्किंग प्लेस' बंद करण्यात आली आहेत. 

Coronavirus:  "को-वर्किंग प्लेस' बंद 
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे  - राज्यात कोरोना संसर्गामुळे मोठ्या कंपन्या आणि उद्योग बंद असून, याचा परिणाम "को-वर्किंग प्लेस'वरही झाला आहे. प्रशासनाने काढलेल्या आदेशानंतर शहरातील बहुतेक "को-वर्किंग प्लेस' बंद करण्यात आली आहेत. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर "को-वर्किंग प्लेस' आहेत. विमाननगर, पाषाण, सेनापती बापट रस्ता, खराडी, हिंजवडी, बाणेर, कोंढवा, मगरपट्टा सिटी, हडपसर, बावधन आदी भागांमध्ये शंभर ते तीनशे जणांना बसता येईल अशी कार्यालये आहेत. त्यात दरमहा भाड्याने कार्यालये मिळते. यात माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी कार्यालये सुरू केली असून, त्यात एका कंपनीचे दोन ते पाच कर्मचारी एकत्र काम करतात. शहरातील अशी बहुतेक "को-वर्किंग प्लेस' बंद करण्यात आली आहेत. 

विमाननगर येथील "वर्कप्लेस'चे संचालक सक्षम मेंदिरत्ता म्हणाले, ""खबरदारी म्हणून आम्ही "को-वर्किंग प्लेस' बंद केले आहे. पुढील सूचना येईपर्यंत आम्ही ते बंद ठेवणार आहोत. सध्याच्या बंदचा आमच्यावर तरी परिणाम झालेला नाही. आमचे सभासदही आमच्यासोबत आहे.'' 

"द स्पेस'च्या वतीने सांगण्यात आले, की सध्या 175 कर्मचारी काम करीत आहेत. बहुतेक कंपन्यांनीच "वर्क फ्रॉम होम' सांगितल्याने आणि कोरोनासंबंधी काळजी म्हणून सभासदांनी "को-वर्किंग प्लेस'मध्ये येणे बंद केले आहे. मागील तीन वर्षांपासूनच शहरातील बहुतांश "को-वर्किंग प्लेस' सुरू झाले आहेत. हे बंद ठेवल्याने आर्थिक बाबींवर काय परिणाम होईल, हे आताच सांगता येणार नाही. 

काय आहे "को-वर्किंग प्लेस'? 
- वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना किंवा आस्थापनांना काम करण्यासाठी जागा आणि इतर सुविधा 
- वायफाय, चहा कॉफी, पुरेशी जागा, आल्हाददायक वातावरण 
- कंपन्या, एखादी व्यक्ती, स्टार्टअप, ऑनलाइन कंपन्या आदींचे कर्मचारी सभासद 
- एका दिवसापासून वर्षापर्यंतचे सभासदत्व