Corona Vaccine : कोरोना लशीच्या मागणीत वाढ; नागरिकांवर हेलपाटे मारण्याची वेळ

‘सहजतेने उपलब्ध असलेला कोव्हिशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली. पुन्हा वाढल्यावर बूस्टर डोस घेऊन असा विचार केला होता.
corona vaccination
corona vaccinationsakal
Summary

‘सहजतेने उपलब्ध असलेला कोव्हिशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली. पुन्हा वाढल्यावर बूस्टर डोस घेऊन असा विचार केला होता.

पुणे - ‘सहजतेने उपलब्ध असलेला कोव्हिशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला आणि दुसरा डोस घेतला. त्यानंतर कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली. पुन्हा वाढल्यावर बूस्टर डोस घेऊन असा विचार केला होता. आता काही देशांमध्ये कोरोनाच्या साथीचा उद्रेक सुरू झाला. त्यामुळे बूस्टर डोस घेण्यासाठी महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये हेलपाटे मारत आहे. पण, बूस्टर डोस काही मिळता मिळत नाही,’ असा नाराजीचा सूर वयाच्या साठीत असलेल्या अरुण कुलकर्णी यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, ‘मला मधुमेह आणि हृदयविकार आहे. त्यामुळे पहिला आणि दुसरा लशीचा डोस वेळेत घेतला. पण, बूस्टरचा डोस पुढे ढकलला. आता तो मिळत नाही. कोव्हिशिल्ड किंवा त्याला पर्यायी लशीचा साठा नाही, हे कारण महापालिका रुग्णालयातून दिले जात आहे.’

का मिळत नाही?

पुण्यात ८० टक्क्यांपेक्षा नागरिकांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने उत्पादित केलेली कोव्हिशिल्ड ही कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. ही लस आता उपलब्ध नाही. त्यामुळे या लशीचे बूस्टर डोस नागरिकांना देता येत नाहीत.

पर्यायी लशीचाही खडखडाट

जगातील काही देशांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागताच शहरात कोरोना प्रतिबंधक लशीच्या बूस्टर डोसची मागणी वाढली. कोव्हिशिल्डच्या बूस्टर डोसला पर्यायी म्हणून आतापर्यंत दिले जाणारे कॉर्बिव्हॅक्स या लशीचाही राज्यात खडखडाट झाला आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड नाही आणि पर्यायी लसही नाही, अशी अवस्था निर्माण झाली असल्याचे चित्र दिसते.

तहान लागल्यावर विहीर नको...

सुरुवातीला जेव्हा ‘कोरोना’ हा शब्द कानावर पडला, तेव्हा आपली काय अवस्था झाली होती ती आठवा. त्यानंतरचे अनेक महिने कोरोनाच्या दहशतीखाली काढले. यातूनही आपण काही शिकलेलो नाही असे वाटते. सध्या पुण्यात बूस्टरचा तुटवडा जाणवत आहे. आपण प्रत्येकवेळी तहान लागल्यावरच विहीर खोदणार का? म्हणून जरा विचार करण्याची गरज आहे. याबाबत आपल्या सूचना नावासह editor.pune@esakal.com या मेलवर किंवा ८४८४९७३६०२ या व्हॉट्सॲप क्रमांकावर कळवा.

किती मागणी वाढली?

कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने लसीकरणाचा वेगही मंदावला होता. राज्यभरात जेमतेम दिवसभरात दोन हजार जण लस घेत होते. ती संख्या आता दहा हजारांपर्यंत वाढली. त्यात सुमारे ९० टक्के जणांनी बूस्टर डोस घेतला असल्याची माहिती आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.

केंद्राकडे धाव...

पुण्यासह राज्यातील प्रमुख देशांमध्ये कोरोना प्रतिबंधक लशीची मागणी वेगाने वाढत आहे. त्यामुळे ही लस उपलब्ध करून द्यावी, याबाबत केंद्र सरकारशी पत्रव्यवहार करून लशीची मागणी नोंदविली आहे, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

कोरोनाच्या कोव्हिशिल्ड लशीचे डोस उपलब्ध नाहीत. त्यामुळे नागरिकांना बूस्टर डोस मिळण्यात अडथळे येत आहेत. शहरातील शंभर टक्के नागरिकांनी प्रतिबंधक लशीचा पहिला डोस घेतला आहे. तर, दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण ९६ टक्के आहे. त्यामुळे आता बूस्टरची मागणी वाढली आहे. लस उपलब्ध होताच महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर लस तातडीने उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

- डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com