‘गोष्टी युक्तीच्या चार’, कोरोना झाला तरी रहा ‘पॉझिटिव्ह’

Corona
CoronaEsakal

पुणे - कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर नाही म्हटलं तर इतरांप्रमाणेच मलाही भीती वाटत होती. त्यात कुटुंबही जवळ नाही त्यामुळे आणखीन खचल्या सारखं वाटत होतं. परंतु, वेळेवर आणि योग्य उपचार घेतले तर नक्कीच आपण कोरोनातून मुक्त होतो. त्यामुळे सकारात्मक विचार ठेऊन या आजारावर नक्की मात करता येते, असा अनुभव सांगत होते ३४ वर्षीय सचिन केदारी.

सचिन हे मूळचे नगर येथील रहिवासी व गेल्या एक-दीड वर्षांपासून ते पुण्यात आहेत. सध्या ते कसबा पेठेतील सूर्य सह्याद्री रुग्णालयात फॅसिलिटी इनचार्ज म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे दररोज रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण व त्यांचे नातेवाईक अशा अनेक लोकांच्या संपर्कात असतात. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याची शक्यता जास्त होती. लक्षणे जाणवल्यानंतर त्यांनी कोरोनाची चाचणी केली. दोन वेळा चाचणी केल्यावरही त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांना घशाचा त्रास होऊ लागला. आपण थंड पदार्थ खात असल्यामुळे हा त्रास होत आहे, असे त्यांना वाटले. परंतु दुसऱ्या दिवशी ताप थकवा जाणवू लागल्यामुळे त्यांनी त्वरित चाचणी केली आणि यावेळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Corona
पुणेकरांना दिलासा; ‘घरबंदी’मुळे रुग्णसंख्या आटोक्यात

शहरात एकटेच असल्यामुळे, तसेच कठीण काळात जवळ कोणी नातेवाईक नाही. अशा स्थितीत त्यांना मानसिक आधाराची गरज त्यांना भासू लागली. परंतु रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांमुळे कुटुंबाची गरज भासली नाही. यामुळे त्यांचा मानसिक ताण व भीती कमी झाली आणि ते उपचारास चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देऊ शकले. इतकंच नाही तर केवळ पाच दिवसात त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. उपचार घेत असतानाही सचिन यांनी काम सुरू ठेवले. रुग्णालयाच्या कामात कोणतेही अडथळे नको म्हणून ते फोनवरून काम करत त्यांची दुहेरी जबाबदारी पार पाडत होते.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

लोकांमध्ये कोरोनाशी निगडित विविध संभ्रम आहेत. अनेकांना असे वाटते की कोरोना झाल्यावर त्यांचे वजन कमी होण्याची शक्यता, अशक्तपणा येतो, सामान्य जीवनावर परिणाम होतो. मात्र, असं काही होत नाही व लोकांनी याकडे दुर्लक्ष करत मानसिकदृष्ट्या खंबीर राहण्याची गरज आहे. तसेच योग्य आहारास नागरिकांनी प्राधान्य देणे अतिशय महत्त्वाचे आहे.

- सचिन केदारी

हे लक्षात ठेवा

- पोषक आहार आणि औषध घेणे

- अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर घाबरू नये

- डॉक्टरांचा सल्ला घेत संपूर्ण उपचार करणे

- कोणत्याही उपचाराला वेळ लागतो. त्यामुळे उपचारादरम्यान संयम बाळगा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com