esakal | रेमडेसिव्हिरला आठ औषधांचा पर्याय? वैद्यकीय चाचण्या आवश्यक
sakal

बोलून बातमी शोधा

remdesivir

प्रयोगशाळेतील संशोधनातून बाजारात उपलब्ध औषधांचा कोरोनाच्या उपचारासाठी उपयोग होऊ शकतो, हे शास्त्रज्ञांनी दाखवून दिले आहे. 

रेमडेसिव्हिरला आठ औषधांचा पर्याय? वैद्यकीय चाचण्या आवश्यक

sakal_logo
By
सम्राट कदम

पुणे - कोरोना विषाणूवरील स्पाईक प्रथिनाला प्रतिबंध करणाऱ्या आठ औषधांचा शोध शास्त्रज्ञांनी घेतला असून, पुढील कार्यवाहीसाठी या औषधांच्या वैद्यकीय चाचण्या होणे आवश्यक आहे. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) भुवनेश्वर येथील विभागीय वैद्यकीय संशोधन केंद्राने केलेले हे संशोधन इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये नुकतेच प्रकाशित झाले आहे.

आयसीएमआरच्या हेल्थ इन्फॉर्मेशन सेंटरचे डॉ. संतोष कुमार बेहरा, डॉ. नमिता महापात्रा, डॉ. चंद्रा त्रिपाठी आणि केंद्राचे डॉ. संघमित्रा पाटी यांनी हे संशोधन केले आहे. रेमडेसिव्हिरसह चालकोन, ग्लॅझोप्रेव्हिर, डॉल्यूटीग्रेव्हिर, एन्झाप्लॅटोव्हीर, डॅक्लेटासिव्हिर, टाईडग्लूसीब, प्रेसाटोव्हिर आणि सॅम्प्रेव्हिर या संयुगांची डॉकींग सिम्युलेशनद्वारे ओळख पटविण्यात आली आहे. अशा ५६ संयुगांवर शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. कोरोना विषाणूवरील काट्यासारखे दिसणारे स्पाईक प्रथिने हे मानवी पेशीतील एसीई-२ या एन्झाईमशी अभिक्रिया करते आणि पेशीत प्रवेश मिळवते. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी या स्पाईक प्रथिनाला प्रतिबंध करणे गरजेचे असते.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

असे झाले संशोधन -
- आधीच्या उपलब्ध माहितीच्या आधारे ५६ संयुगांची अर्थात औषधांची निवड
- संबंधित संयुगांची डॉकिंग सिम्युलेशन (ऑटोडॉक ४.२) ही संगणकीय पडताळणी
- आठ औषधे सार्स कोविड -२ विषाणूच्या स्पाईक प्रथिनाला प्रतिबंध करत असल्याचे सिद्ध
- उर्वरित औषधांवर अजून संशोधन चालू आहे

वैद्यकीय चाचण्या आवश्यक
शास्त्रज्ञांनी जरी कोरोना उपचारासाठी प्रभावी असलेल्या औषधांची नावे सुचवली असली, तरी ही औषधे प्रत्यक्ष वापरात येण्यासाठी त्यांचे वैद्यकीय चाचण्या होणे आवश्यक आहे. यासाठी औषध कंपन्यांनी पुढाकार घेत रुग्णालयांमध्ये या चाचण्या करायला हव्यात. सध्या फक्त रेमडेसिव्हिर हे औषधच बाजारात उपलब्ध आहे.

हे वाचा - पुण्यातील ग्रामीण रुग्णांसाठी झेडपी खरीदणार रेमडेसिविर; आरोग्य सभापतींची माहिती

प्रयोगशाळेतील संशोधनातून बाजारात उपलब्ध औषधांचा कोरोनाच्या उपचारासाठी उपयोग होऊ शकतो, हे शास्त्रज्ञांनी दाखवून दिले आहे. मात्र यांच्या प्रत्यक्ष वापरासाठी वैद्यकीय चाचण्या होऊन, संबंधित औषधांची परिणामकारकता, सुरक्षितता आणि साइड इफेक्ट तपासावे लागतील. निश्चितच कोरोनाच्या उपचारासाठी एकापेक्षा अधिक औषधांची आवश्यकता आहे.
- डॉ. आरती किणीकर, बालरोगतज्ज्ञ आणि संशोधक, ससून रूग्णालय, पुणे.

loading image
go to top