Corona Virus : पुण्यात पहिल्या २ कोरोनाबाधित रुग्णांना डिस्‍चार्ज; आणखी 3 रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Coronavirus infected two persons were discharged in pune
Coronavirus infected two persons were discharged in pune

पुणे : जिल्‍ह्यात कोरोनाच्‍या पहिल्‍या ज्‍या  दोन व्‍यक्‍ती अॅडमिट झाल्‍या होत्‍या, त्‍यांच्‍या दोन्‍ही टेस्‍ट निगेटीव्‍ह आल्‍या आहेत,  त्‍यामुळे आज त्‍यांना डीस्‍चार्ज दिला आहे. दुसऱ्या दिवशी जे  तीन पेशंट अॅडमिट झाले होते, त्‍यांच्‍या पहिल्‍या टेस्‍ट निगेटीव्‍ह आल्‍या आहेत, आज त्‍यांच्‍या दुसऱ्या टेस्‍ट घेत आहोत, त्‍या निगेटीव्‍ह आल्‍या तर त्‍यांना उद्या डिस्‍चार्ज दिला जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर यांनी दिली. गुढीपाडव्‍याच्‍या शुभेच्‍छा देतांनाच सर्वांच्‍या मदतीने कोरोनावर मात करु, असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

Coronavirus : घाबरू नका, लॉकडाऊनच्या काळातही जीवनावश्यक सेवा सुरुच!

पुणे विभागातील कोरोनाच्‍या सद्यस्‍थ‍ितीची माहिती देतांना विभागीय आयुक्‍त डॉ. म्‍हैसेकर म्‍हणाले, पुणे विभागात एकूण  825 नमुने घेतले होते, त्‍यापैकी  737 चे अहवाल प्राप्‍त झाले.  यामध्‍ये 692 अहवाल निगेटीव्‍ह आले आहेत तर 37 अहवाल पॉझिटीव्‍ह आले आहेत. याचा अर्थ जवळ-जवळ 90 टक्‍के अहवाल निगेटीव्‍ह आलेत, ही समाधानाची बाब आहे.

गुगल प्लेद्वारे मोबाईल अँप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

''आरोग्‍य यंत्रणेने पहिले दोन पेशंट बरे व्‍हावे, यासाठी रात्रंदिवस अथक प्रयत्‍न केले. पुणे, पिंपरी चिंचवड तसेच  विभागाच्‍या इतर जिल्‍ह्यातील अधिकारी हे कोरोनाच्‍या प्रतिबंधासाठी काम करीत आहे, या सर्वांचे त्‍यांनी कौतुक केले. तसेच काही कर्मचारी आदेशाचे उल्‍लंघन करुन निघून जात असतील तर त्‍यांच्‍यावर प्रशासन कठोर कारवाई करेल, असा इशाराही डॉ. म्‍हैसेकर यांनी दिला. या संकट समयी कुठेही डगमगून जावू नका, आपण सर्व एकत्र मिळून कोरोनावर मात करु या,''असे आवाहन करुन स्‍वत:ला सुरक्षित ठेवा,  त्‍याच बरोबर सगळयांना सुरक्षित  ठेवा, असेही ते म्‍हणाले.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com