esakal | पुण्यात घरेलू कामगारांवरून सोसायट्यांमध्ये सुरू झाले वाद; वाचा सविस्तर बातमी
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus lockdown domestic servants issue residential societies

घरेलू कामगार, ड्रायव्हर यांना प्रवेश देण्यावरून सोसायट्यांमध्येही मतभेद निर्माण झाले आहेत.

पुण्यात घरेलू कामगारांवरून सोसायट्यांमध्ये सुरू झाले वाद; वाचा सविस्तर बातमी

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : सोसायट्यांमध्ये घरेलू कामगारांना (मोलकरीण, ड्रायव्हर, माळी आदी) कामावर जाण्यासाठी महापालिका आणि कामगार आयुक्त कार्यालयाने परवानगी दिलेली असली तरी, त्यावरून अनेक सोसायट्यांमध्ये वाद सुरू झाले आहेत. घरेलू कामगारांना कामावर येण्यासाठी परवानगी द्या, अशी रहिवाशांची मागणी आहे, तर सोसायट्यांमधील प्रशासन बंदवर ठाम आहे. तर, काही सोसायट्यांनी परवानगी दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोथरूडमधील स्वप्नशिल्प, करीश्मा, बिबवेवाडीतील रम्यनगरी, एरंडवणा येथील हिमाली आदी मोठ्या सोसायट्यांनी घरेलू कामगार, ड्रायव्हर यांना विविध अटींवर सोसायटीत प्रवेश दिला आहे. गंगाधाम, गगण विहार, वर्धमानपुरा, लेकटाऊन, संकुल आदी सोसायट्यांनी अजूनही त्यांचे दरवाजे बंदच ठेवले आहेत. घरेलू कामगार, ड्रायव्हर यांना प्रवेश देण्यावरून सोसायट्यांमध्येही मतभेद निर्माण झाले आहेत. प्रवेश देण्यासाठी जबाबदारी कोणी घ्यायची, असा प्रश्न पदाधिकारी उपस्थित करीत आहेत. तर, पुरेशी काळजी घेऊन घरेलू कामगार, ड्रायव्हर यांना परवानगी देऊ, अशी रहिवाशांची मागणी आहे.

दरम्यान, घरेलू कामगारांना कामावर प्रवेश देण्याची ही जशी त्यांची गरज आहे, तशीच त्या घरातील महिलांनाही मदतीसाठी आता कोणी तरी हवे आहे, त्यामुळे घरेलू कामगारांना सोसायट्यांनी प्रवेश द्यायला हवा, असे मत पुणे जिल्हा घरकामगार संघटनेच्या अध्यक्षा किरण मोघे यांनी व्यक्त केले. अनेक सोसायट्यांमध्ये पदाधिकारी पुरुष आहेत. त्यामुळे त्यांना महिलांचे प्रश्न समजू शकत नाही. यामुळे त्यांनी घरेलू कामगारांसाठी दरवाजे बंद ठेवले आहेत. यामध्ये बदल व्हायला हवा, असेही त्यांनी सांगितले.

आणखी वाचा - पुण्यातल्या गणेशोत्सवा संदर्भात महत्त्वाची बातमी

कोथरूडमधील स्वप्नशिल्प सोसायटीचे सचिव प्रशांत भोलागीर म्हणाले, ``महापालिकेने परवानगी दिल्यावर आम्ही 300 घरेलू कामगार, 48 ड्रायव्हर आणि गाड्या धुणाऱया 16 व्यक्तिंना प्रवेश दिला आहे. त्यासाठी त्यांची रोज तपासणी केली जाते. सोसायटीच्या प्रवेशद्वारावर सॅनिटायझर ठेवण्यात आले आहेत. पुरेशी खबरदारी घेऊन आम्ही परवानगी दिली आहे. सोसायटीच्या रहिवाशांनीही याबाबत सातत्याने मागणी केली होती. तिची दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.``

गगन विहार मध्ये राहणाऱया शर्मिला ओसवाल म्हणाल्या, ``आमच्या सोसायटीत अजूनही घरेलू कामगारांना प्रवेश दिलेला नाही. संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये महिलांवर घरकामाचा खूप ताण येतो. सलग दोन महिने त्या त्यात अडकल्या आहेत. त्यामुळे आमच्या सोसायटीतील महिलांनी सोसायटीच्या पदाधिकाऱयांशी संपर्क साधून घरेलू कामगारांना परवानगी द्या, अशी मागणी केली आहे. त्यासाठी पुरेशी काळजी घेऊन कार्यपद्धतीचा अवलंब केला जाईल, असेही आम्ही सांगितले आहे.``

आणखी वाचा - कोरोनाची धावपळ; पुण्यात आयुक्तांचं वजन घटलं

हिमाली सोसायटीतील रहिवासी हर्षदा फरांदे म्हणाल्या, ``वर्क फ्रॉम होम असेल तर, विशिष्ट वेळी महिलांना लॉग इन व्हावे लागते. तत्पूर्वी चहा, नाष्टा, दुपारचे जेवण, भांडी आदी कामे करावी लागतात. ही कामे करून ऑफिसचे काम करणे अवघड होते. शिवाय इतरही कामे असतातच. त्यामुळे घरेलू कामगारांना कामावर पुरेशी काळजी घेऊन प्रवेश दिला पाहिजे. घरेलू कामगार ही एक गरज आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.``

loading image