
पुणे : लॉकडाउनच्या धक्यातून सावरतो ना सावरतो, तोच रात्रीच्या संचारबंदीने प्रवासी नागरिकांसह विद्यार्थी आणि व्यावसायिकांच्या तोंडचा घास पळवला आहे. संचारबंदीमुळे रात्री आठ नंतर शहरातील खाणावळी बंद होत असून, परवडणाऱ्या दरात खाद्य पदार्थांची विक्री करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांनाही दुकान बंद करावी लागत आहे. एकीकडे गरजू विद्यार्थी, कष्टकरी आणि प्रवासी नागरिकांची रात्रीची जेवणाची व्यवस्थाच बंद झाली असून, दुसरीकडे आत्ताच कुठे रुळावर आलेल्या व्यवसाय पुन्हा एकदा बंद पडायच्या मार्गावर आहे.
स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासासाठी पुण्यात आलेला राजकुमार मुंडे म्हणतो,‘‘रात्री आठनंतर खाणावळी बंद होतात. तसेच लॉकडाउनची शक्यता असल्यामुळे खाणावळी चालकही मोठ्या दुविधेत आहे. अशात आमच्यासारख्या विद्यार्थ्यांचे खायचे हाल होतात. आधीच संपूर्ण वर्ष वाया गेले आहे. त्यात आता या प्रकारामुळे अजून अडचणीत वाढ झाली आहे.’’ आठ वाजताच खानावळ बंद करावी लागत असल्यामुळे रात्रीचे जेवण बनवणे परवडत नाही. पर्यायाने रात्रीची खानावळ बंद ठेवणे परवडते, असे खाणावळींचे चालक सांगतात. पुण्यात सरकारी कामानिमित्त आलेले मोहन राऊत सांगतात, ‘‘दुपारी कागदपत्रांच्या कामासाठी पुण्यात आलो. आता गावाकडे निघालोय पण बस ला उशीर आहे. भूक लागलीय परंतु खाण्याची काहीच व्यवस्था नाही.’’ वाकडेवाडी येथील शिवाजीनगर बसस्थानकावर आलेले चालक आणि वाहक यांना रात्रीच्या जेवणासाठी व्यवस्थाच उपलब्धी. स्थानकासमोर असलेली सर्व हॉटेल्स आठ नंतर बंद होतात. त्यामुळे प्रवासी नागरिकांसह चालक वाहक यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
लॉकडाउनमुळे कोरोना तर कमी नाही झाला. उलट उपासमारीची वेळ आली आहे. आता कुठे काम मिळायला लागले. तर त्यात रात्रीच्या संचारबंदीमुळे अडचणीत अधिक वाढ झाली आहे. रात्रीचे जेवायचे कुठे हा प्रश्न पडतो.
- सलीम अहमद, कामगार, उत्तरप्रदेश
रात्री आठ नंतर खानावळ बंद होणार असल्याने मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. सगळ्यांनाच आठच्या आत जेवता येत नाही. पार्सल मिळते पण ते खाण्यासाठी खोलीवर सर्व साहित्य असेलच असे नाही.
- तुषार निंभोरकर, विद्यार्थी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.