पुणे - शहरात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असून या रुग्णांसाठी उपचार पद्धतीबाबत आरोग्य विभागाने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
या नव्या उपचारपध्दतीनुसार रुग्णांची स्थिती, वयोगट आणि ऑक्सिजन पातळीच्या आधारे उपचारात बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सहव्याधी असलेल्या व रुग्णालयात भरती झालेल्या कोरोना रुग्णांना तीन ते पाच दिवस रेमडेसिव्हीर वापरण्याच्या सूचना यामध्ये देण्यात आल्या आहेत.