Coronavirus: पुणे जिल्ह्यातील पान टपऱ्या बंद; बारामतीचे व्यवहार थंडावणार!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 March 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार आज  संध्याकाळपासून बारामतीतील दुकाने, सेवा आस्थापने, उपहारगृहे, खाणावळ, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, क्लब, जलतरण तलाव, सिनेमागृहे, नाट्यगृह, व्यायामशाळा, खाजगी शिकवणी, परमिटरुम, बिअरबार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

बारामती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार आज  संध्याकाळपासून बारामतीतील दुकाने, सेवा आस्थापने, उपहारगृहे, खाणावळ, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, सुपर मार्केट, क्लब, जलतरण तलाव, सिनेमागृहे, नाट्यगृह, व्यायामशाळा, खाजगी शिकवणी, परमिटरुम, बिअरबार पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश कडुसकर यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी नुकताच, जिल्ह्यातील पान टपऱ्या बंद करण्याचा निर्णय जाहीर केले आहे. याबाबतचे परिपत्रकही जाहीर करण्यात आले आहे. पान टपऱ्यांवरील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आणि थुंकीतून होणारा संसर्गाचा धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्हाधिका-यांच्या आदेशानुसार बारामतीतील वरिल सर्व घटकांचे कामकाज बंद ठेवण्याबाबत आज संध्याकाळपासूनच नगरपालिका कर्मचा-यांनी आवाहनास प्रारंभ केला आहे. कोरोनाचा फैलाव होण्यापूर्वी काळजी घेण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कडुसकर यांनी दिली. परस्परांच्या संपर्कात येण्यामुळे हा धोका वाढण्याची शक्यता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

- Coronavirus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने घेतला मोठा निर्णय!

दरम्यान शासकीय, निमशासकीय कार्यालय, सरकारी महामंडळांचे उपक्रम, अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती, रुग्णालय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, दवाखाने, सर्व वैद्यकीय व नर्सिंग कॉलेज, रेल्वे, एसटी, रिक्षा थांबे, अंत्यविधी, अत्यावश्यक किराणा सामान, दुध, दुग्धोत्पादने, फळे व भाजीपाला, औषध दुकाने, हॉटेल व लॉजमध्ये वास्तव्यास असलेल्या ग्राहकांना खाद्यपदार्थ पुरविणे, परिक्षेसाठी जाणारे विद्यार्थी व संबंधित व्यक्ती, प्रसारमाध्यमांची कार्यालये यांना यातून वगळण्यात आले आहे, असेही कडुसकर यांनी सांगितले. पुढील आदेश येईपर्यंत नागरिकांनी दुकाने व इतर बाबी बंद ठेवून सहकार्य करावे असे आवाहन योगेश कडुसकर यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus pan shop district and baramati malls theaters will shut down