esakal | Coronavirus : पिरंगुटमधील कोरोनाबाधित रुग्ण बरा; तर भोरमध्ये आणखी एक कोरोनाग्रस्त
sakal

बोलून बातमी शोधा

Coronavirus patients in pirangut are recover another corona patient found in Bhor

पिरंगुट (ता.मुळशी) येथील कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने संबंधित रुग्णाला काल (ता. १६) गुरुवारी नायडू हॉस्पिटल मधून घरी  सोडण्यात आले आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेले सर्वजण निरोगी असून त्यांना कोणतीही बाधा झालेली नाही.

Coronavirus : पिरंगुटमधील कोरोनाबाधित रुग्ण बरा; तर भोरमध्ये आणखी एक कोरोनाग्रस्त

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिरंगुट/भोर (पुणे) : पिरंगुट (ता.मुळशी) येथील कोरोनाबाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने संबंधित रुग्णाला काल (ता. १६) गुरुवारी नायडू हॉस्पिटल मधून घरी  सोडण्यात आले आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेले सर्वजण निरोगी असून त्यांना कोणतीही बाधा झालेली नाही. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सतरा जणांच्यावर आरोग्य विभाग लक्ष ठेवून होता. त्यापैकी कोणालाही कोणालाही कोरोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ही माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अजित कारंजकर यांनी दिली आहे. मात्र, अद्याप लॉकडाऊन चालू असल्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अभय चव्हाण व पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी केले आहे.

आरबीआयकडून ५०हजार कोटींचे पॅकेज जाहीर; लघु आणि मध्य उद्योगांना दिलासा

भोरमध्ये आणखी एक करोना ग्रस्त
नेरे (ता.भोर) येथे अजून एक कोरोनाग्रस्त आढळला आहे. कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या भावाच्या मुलीला कोरोनाची लागण झालेली आहे. कोरोनाग्रस्ताच्या २१ नातेवाईकांना तपासणीसाठी पुण्यात पाठवले होते. त्यापैकी एका मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर २० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यामुळे भोर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ०२ झाली आहे.

loading image
go to top