esakal | आरबीआयकडून ५०हजार कोटींचे पॅकेज जाहीर; लघु आणि मध्य उद्योगांना दिलासा
sakal

बोलून बातमी शोधा

RBI Governor Das announces Rs 50000 crore

आरबीआयकडून नाबार्ड, सीआयडीबीआय, एनएचबीला ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यात नाबार्डला २५ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. सीआयडीबीआयला १५ हजार कोटी आणि एनएचबीला १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे.

आरबीआयकडून ५०हजार कोटींचे पॅकेज जाहीर; लघु आणि मध्य उद्योगांना दिलासा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आरबीआयकडून नाबार्ड, सीआयडीबीआय, एनएचबीला ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. त्यात नाबार्डला २५ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. सीआयडीबीआयला १५ हजार कोटी आणि एनएचबीला १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. आज (ता. १७) आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सकाळी पत्रकार परिषदेत या घोषणा केल्या आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या संस्थांबरोबर झालेल्या चर्चेच्या आधारावर ही आर्थिक मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली. रिव्हर्स रेपो रेट २५ बेसिक पॉईंटने कमी करण्यात आला आहे. आता रिव्हर्स रेपो रेट ३.७५ टक्के राहणार असल्याची माहितीही दास यांनी यावेळी दिली. 

जगामध्ये मोठी मंदी येण्याची शक्यता आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतामध्ये चांगली स्थिती आहे. यावर्षी १.९ टक्के विकास दर राहण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. आयएमएफनुसार कोरोनाचे संकट संपल्यानंतर विकास दर ७.२ टक्क्यापर्यंत पोहोचू शकतो असे शक्तीकांत दास म्हणाले. सध्या हे मोठे जागतिक संकट असून या परिस्थितीत आर्थिक नुकसान कमीत कमी व्हावं यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, जगभरात कच्चा तेलाच्या दरामध्ये घसरण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

loading image
go to top