पुण्यात हॉटस्पॉट संदर्भात मोठा निर्णय; दहा ठिकाणची सर्व दुकाने होणार बंद

coronavirus pune city 10 hot spots all shops will remain closed
coronavirus pune city 10 hot spots all shops will remain closed

पुणे Coronavirus : शहरातील कोरोनाच्या अतिसंक्रमणशील (हॉटस्पॉट) भागात 10 पोलिस ठाण्यांच्या अंर्तगत दूध विक्रीची दुकाने सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत उघडी राहणार आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश पोलिसांनी दिला आहे. एक ते तीन दरम्यान हे निर्बंध लागू राहणार आहेत. 

समर्थ, खडक, फरासखाना, स्वारगेट, लष्कर, बंडगार्डन, सहकारनगर, दत्तवाडी, येरवडा आणि खडकी या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत हे निर्बंध लागू होतील, असे पोलिसांनी म्हटले आहे. या भागात दूध विक्रीची दुकाने सकाळी 10 ते 12 दरम्यान सुरू राहतील तर, जीवनावश्यक वस्तुंच्या विक्रीची दुकाने बंद राहतील, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. शिधापत्रिकेवरील अन्नधान्य वितरणासाठी आणि वैद्यकीय उपचारांसाठी, दुकानांसाठी हे निर्बंध लागू राहणार नाहीत, असेही पोलिसांनी म्हटले आहे. एक मे रोजी सकाळी 6 ते 3 मे रोजी रात्री 12 पर्यंत निर्बंध असतील, असे पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी म्हटले आहे. उर्वरित पुण्यात दुकाने 10 ते दुपारी 2 दरम्यान सुरू राहणार आहेत. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

दरम्यान, ज्या भागांमध्ये कडक निर्बंध लागू झाले आहेत. त्या भागात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कसा होणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. परंतु, त्याचाही विचार करण्यात आला असून, घरपोच वितरण सेवा ही सकाळी सहा ते दहा यावेळेत सुरू राहणार आहे. त्यामुळं सकाळी दहा ते दहा यावेळेत घरात किराणा आणि दूध यांसारख्या जीवनावश्यक वस्तू पुरवता येणार आहेत. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

पुण्यातील भवानी पेठ, येरवडा, घोले रस्ता, येरवडा आणि कसबा क्षेत्रीया कार्यालायच्या अखत्यारित सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. या पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या अखत्यारितील प्रभागांवर महापालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी सध्या युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या क्षेत्रीय कार्यालयांच्या अंर्तगत येणाऱया भागावर लक्ष ठेवण्यासाठी दहा पोलिस ठाण्यांसाठी सुधारित आदेश बजावण्यात आला आहे. शहरात कोरोनाचे सध्या 1432 रुग्ण असून आत्तापर्यंत 93 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 230 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. पुण्यात 9 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com