पुणे ते जम्मू-काश्मीर व्हाया नागपूर 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 May 2020

पुण्यात शिकणारे जम्मू-काश्मीरचे 65 विद्यार्थी व 15 नागरिकांना घेऊन महामंडळाच्या तीन गाड्या नागपूरला रवाना झाल्या.ऐंशी जणांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून नागपूरपर्यंत पोचविण्याचा निर्णय घेतला.

पुणे : पुण्यात शिकणारे जम्मू-काश्मीरचे 65 विद्यार्थी व 15 नागरिकांना घेऊन महामंडळाच्या तीन गाड्या नागपूरला रवाना झाल्या. तेथून हे सर्वजण रेल्वेने जम्मू काश्मीरला जातील. लॉकडाऊनमुळे पुणे जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी यांना त्यांच्या राज्यात अटी-शर्तींची पूर्तता करून जाऊ देण्याचा शासनाने निर्णय घेतला. त्यामुळे वंदे मातरम संघटना, सरहद पुणे यांनी शहरातील काश्मिरी विद्यार्थ्यांची परतण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली होती.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी या ऐंशी जणांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून नागपूरपर्यंत पोचविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुणे शहर तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समन्वय अधिकारी नीता शिंदे आणि समन्वय सहायक विवेक जाधव यांनी या नागरिकांकडून हमीपत्र भरून घेणे, आरोग्य तपासणी करणे याबाबत आवश्यक कार्यवाही केली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नागपूरपर्यंत जाण्यासाठी तीनही बस रवाना करण्यापूर्वी फूड पॅकेट, पिण्याचे पाणी यांची व्यवस्था करण्यात आली. सोशल डिस्टन्सिगचे पालन, मास्कचा वापर या सर्व बाबींचा अवलंब करण्याच्या सर्व प्रवाशांना सूचना देण्यात आल्या आणि दुपारी चारच्या सुमारास या बस नागपूरच्या दिशेने रवाना झाल्या. तेथून रेल्वेने हे सर्वजण जम्मू काश्मीरला पोचतील. त्यासाठी रेल्वेची व्यवस्था आधीच करण्याच आल्याचे डॉ. कटारे यांनी सांगितले.

मोठी बातमी : पुण्यात उतरणार सशस्त्र पोलिस दल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus students moving for jammu kashmir via nagpur