कोरोनाच्या जलद औषध चाचणीसाठी भारतीय शास्रज्ञांनी लढवली शक्कल..

Coronavirus will grow in human lung cells for rapid drug testing
Coronavirus will grow in human lung cells for rapid drug testing
Updated on

पुणे : कोविड-19 वरील लस आणि औषधांची जलद गतीने प्रयोगशाळेत चाचणी घेण्याची तयारी भारतीय शास्त्रज्ञांनी केली आहेत. मानवी फुफ्फुसातील पेशींमध्ये कोविड-19च्या विषाणूची वाढ करण्यात येणार आहे. हैदराबाद येथील पेशी आणि आण्विक जीवशास्त्र केंद्र (सीसीएमबी) आणि बंगळूर येथील एस्टिम रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडमध्ये यासंबंधीचा करार झाला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एस्टीमच्या वतीने मानवी फुफ्फुसातील इपीथॅलीयल पेशींचे कल्चर पुरविण्यात येणार आहे. त्याद्वारे सीसीएमबीच्या प्रयोगशाळेत पेशीतील बदल आणि रोगचिकित्सक वैशिष्ट्ये आभ्यासण्यात येणार आहे. यामुळे जलद गतीने आणि मोठ्या प्रमाणावर औषधांच्या चाचण्या घेणे शक्‍य होणार आहे. सीसीएमबीचे संचालक डॉ. राकेश मिश्रा म्हणाले,"मानवी शरीराबाहेर विषाणूची पेशींमध्ये वाढ करणे मोठे आव्हान आहे. भारतीय शास्त्रज्ञ मानवी पेशीतील एसीई-2 प्रथिन आणि जनुके कोरोना विषाणूला पेशी प्रवेशासाठी कशी मदत करतात याचा अभ्यास करणे शक्‍य होणार आहे. तसेच औषधांचा त्यावरील परिणामही अभ्यासता येईल.'' डॉ. कृष्णा हर्षण यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांचा चमू हे कार्य करणार आहे. 

विद्यार्थ्यांनो, अभ्यासाला लागा ! नीट, जेईई मेनच्या तारखा जाहीर

सुविधेचे वैशिष्ट्ये 
- देशात पहिल्यांदाच फुफ्फुसाच्या पेशींमध्ये कोरोना विषाणूची वाढ 
- प्रयोगशाळेत कोरोना औषधाच्या चाचणीला मिळणार वेग 
- औषधांच्या चाचणीच्या वेळेबरोबरच अचूकता वाढणार 
- पेशीस्तरावरील उपचार आणि रोगाच्या प्रसाराचे मॉडेलिंग करणे शक्‍य 


स्थगित केलेल्या परीक्षांचे काय? एमपीएसीकडून खुलाशाची मागणी

"कोविड-19 वरील औषधांच्या प्रयोगशाळेतील चाचणीसाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे औषधांच्या परिणामाचा खोलवर आणि अचूकतेने अभ्यास करता येणे शक्‍य होणार आहे. औषधांच्या प्रयोगशाळेतील परिणामांच्या अभ्यासावर आधारित मोठ्या जनसंख्येसाठी मॉडेल विकसित करने शक्‍य होणार आहे.'' 
- डॉ. जोगीन देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, एस्टिम. 

मोठी बातमी! विद्यापीठ परीक्षांचे वेळापत्रक दोन दिवसात होणार जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bibwewadi NEET Paper Leak Case: Key Suspect Manisha Waghmare in Custody
Baramati Flight Academy Faces Safety Questions Amid Series of Aircraft Mishaps
Pune Elderly Couple Promotes Fitness and Healthy Living Through Daily Cycling
WFH Back in Focus: Pune Tech Workers Seek Relief from Daily Traffic Chaos
Marathi News Esakal
www.esakal.com