स्थगित केलेल्या परीक्षांचे काय? एमपीएसीकडून खुलाशाची मागणी

Disclosure from MPSC about the postponed exams
Disclosure from MPSC about the postponed exams

पुणे : पुण्यात अडकून पडल्याने स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आधीच तणावात असताना यंदा नविन पदभरती होणार नसल्याने आणखी त्यात भर पडली आहे. ज्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत त्याबद्दल तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) खुलासा करावा अशी मागणी विद्यार्थांनी केली आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

'कोरोना'चा प्रभाव वाढत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 'राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२०', 'महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब, संयुक्त पूर्व परीक्षा २०२०' आणि 
'महाराष्ट्र अभियांत्रिकीसेवा पूर्व परीक्षा २०२०' या  ढकलण्याचा निर्णय यापुर्वीच जाहीर केला आहे.  पुढील तारीख लाॅकडाऊन संपल्यावर यथावकाश जाहीर केल्या जाणार आहेत. असे यापूर्वीच आयोगाने जाहीर केले आहे. 

दरम्यान, कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती खालावलेली असल्याने मोठ्या प्रमाणात खर्चावर निर्बंध आणत यात नवीन पदभरती करू नये असे आदेश दिले आहेत. यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी गोंधळले आहेत. या पुढे ढकलल्या परीक्षा होणार की नाही असा प्रश्न विद्यार्थांपुढे निर्माण झाला आहे.

पुणेकर कन्फ्यूज; सरकार म्हणतंय दुकानं सुरू, व्यापाऱ्यांची वेगळीच भूमिका

प्रमोद वाडीकर म्हणाला, "राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज भरला आहे. कोरोनामुळे ही परीक्षा स्थितीत केली. आता राज्य सरकारने पदभरतीवर निर्बंध आणल्याने नेमके काय होणार हे कळत नाही. याबाबत एमपीएससीने स्पष्टीकरण दिले पाहिजे."
बबन दागडे म्हणाला, "आर्थिक स्थिती खराब झाल्याने नवीन भरती होणार नाही, आम्हाला धक्का आहे. पुण्यात अडकून पडलेलो असताना ही अभ्यास करत होतो. पण आता टेंशन मध्ये आणखी भर पडली आहे."

आता वकिलांना घरबसल्या करता येणार दावे दाखल; सर्वोच्च न्यायालयाने उचलले महत्वाचे पाऊल

एमपीएससी स्टुडंट्स राइट्सचे महेश बडे म्हणाले, "ज्या परीक्षांची जाहीरात आली आहे, अर्ज भरले आहेत अशा राज्य सेवा पूर्व परीक्षा, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षांची भरती होईल अशी अपेक्षा आहे. मात्र याबाबत आपण आयोगाने स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे."दरम्यान, याबाबत चौकशी करण्यासाठी एमपीएससीचे  प्रमुख सतीश गवई यांच्याकडे फोन केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com