पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे भ्रष्टाचार : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपोषण सुरू

 पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे भ्रष्टाचार : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपोषण सुरू

घोडेगाव : पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे (ता. आंबेगाव) येथील नळपाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्यावर फौजदारी गु्न्हे दाखल केले नाही तसेच अपहार केलेल्या रकमेचे व्याज अदा केले नाही याच्या निषेधार्थ घोडेगाव (ता. आंबेगाव) पंचायत समितीच्या आवारात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. दरम्यान या योजनेच्या चौकशीकामी मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी 1 एप्रिल रोजी संबंधितांना जिल्हा परिषदेमध्ये चौकशीकामी बोलविले असल्याचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी सांगितले. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे ग्रामपंचायत मध्ये सन 2005 ते 2018 या कालावधीमध्ये पुणे जिल्हा परिषदे मार्फत नळपाणी योजनेसाठी 26 लाख 43 हजार 197 रूपये निधी मिळाला होता. त्यापैकी 19 लाख 6 हजार 979 इतका निधी या योजनेवर खर्च झालेला असुन सनदी लेखापाल यांनी योजनेचे लेखापरीक्षण करून 20 ऑगस्ट 2018 रोजी अहवाल समितीस दिलेला आहे. तसेच शिल्लक निधी 7 लाख 36 हजार 218 रूपये 9 सप्टेंबर 2009 अखेर ग्रामपंचायत खात्यावर शिल्लक राहणे आवश्यक होते. परंतु संबंधित रक्कम समितीने परस्पर खर्च केल्याचे दिसुन येत आहे. याबाबत संबंधित शिल्लक रक्कम व त्यावरील व्याज असे एकंदरीत 14 लाख 98 हजार 256 भरणा करावा असे तत्कालीन अध्यक्ष ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे ग्रामपंचायतीस भरणा करावा असे सांगितले होते. मात्र प्रत्यक्ष ग्रामपंचायत पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे यांनी फक्त शिल्लक रक्कम 10 सप्टेंबर 2018 रोजी शासन शासन तिजोरीत भरली. परंतु त्या रक्कमेवरील दंडनीय व्याज भरले नाही.

याबाबत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊनही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले नाही. याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करावे यासाठी आंबेगाव तालुका स्वाभिमान शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर, प्रविण पडवळ, अनिल पोखरकर, कैलास पोखरकर, वनाजी बांगर, पंकज पोखरकर, उमेश पडवळ, अरूण बांगर, विकास एरंडे यांनी पंचायत समिती आवारात बेमुदत उपोशण व धरणे आंदोलन सुरू केले आहे.

दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद पुणे यांनी दिलेल्या पत्रानुसार ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती अध्यक्ष व सचिव, तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच, उपअभियंता, शाखा अभियंता व विदयमान ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती अध्यक्ष व सचिव, ग्रामसेवक, सरपंच, उपअभियंता, शाखा अभियंता तसेच तक्रारदार, विस्तार अधिकारी, गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे येथील पाणीपुरवठा योजनेचे चौकशी कामी 1 एप्रिल रोजी जिल्हा परीषद पुणे येथे उपस्थित रहाण्यास सांगितले असल्याचे गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी सांगितले.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com