Cosmos Bank Meeting
sakal
पुणे - कॉसमॉस को-ऑप. मल्टिस्टेट शेड्यूल्ड बँकेने ३१ मार्च २०२६ अखेर ११८ कोटी १२ लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला असून, सभासदांसाठी दहा टक्के लाभांश जाहीर केला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष सचिन आपटे यांनी दिली. या आर्थिक वर्षात बँकेचा एकूण व्यवसाय ४४ हजार कोटी रुपयांवर गेला आहे.