
पुणे - कॉसमॉस बँकेने आत्तापर्यंत १९ लहान सहकारी बँकांचे विलीनीकरण करून घेतले आहे. बंगळूर येथील दि नॅशनल को-ऑप. बँकेचे कॉसमॉस बॅंकेत विलीनीकरण हे या क्षेत्रातील सर्वात मोठे विलीनीकरण आहे. त्यामुळे कॉसमॉस बँकेच्या १८३ शाखा आणि व्यवसाय ३६ हजार पाचशे कोटींहून अधिक झाला आहे, अशी माहिती बॅंकेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांनी दिली.