
पुणे - बंगळूर येथील दि नॅशनल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व १३ शाखांचे रिझर्व्ह बँकेच्या मंजुरीने कॉसमॉस बँकेत विलीनीकरण करण्यात आले आहे. या सर्व शाखा सहा जानेवारीपासून ग्राहकांच्या सेवेत कार्यरत झाल्या असून, कॉसमॉस बँकेच्या सुविधा आता या बॅंकेच्या ग्राहकांना मिळतील, अशी माहिती बँकेचे सीए मिलिंद काळे यांनी दिली.