esakal | आंबिल ओढ्याची डागडुजी करूनही धोका कायमच
sakal

बोलून बातमी शोधा

आंबिल ओढ्याची डागडुजी करूनही धोका कायमच

जागा मिळेल, तिथे थाटलेली बांधकामे. राडरोड्याचे ढीग आणि देखभालीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आंबिलओढा आक्रसला. पण त्यानंतर वर्ष-दोन वर्षांनी केलेल्या डागडुजीचा खर्च शंभर कोटींच्या घरात गेला आहे.

आंबिल ओढ्याची डागडुजी करूनही धोका कायमच

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे -  जागा मिळेल, तिथे थाटलेली बांधकामे. राडरोड्याचे ढीग आणि देखभालीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आंबिलओढा आक्रसला. पण त्यानंतर वर्ष-दोन वर्षांनी केलेल्या डागडुजीचा खर्च शंभर कोटींच्या घरात गेला आहे. ओढ्याच्या खोलीकरणाच्या कामात एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा ओतूनही ओढा सुरक्षित नसल्याचा अहवाल महापालिकेनेच दिला आहे. येथील बहुतांशी कामे क्षेत्रीय कार्यालयाने केल्याचे सांगण्यात येत असले तरी, याचा नेमका तपशील उपलब्ध होत नाही. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ओढ्यालगतच्या भागासह मूळ प्रवाह, त्याला जोडलेल्या नाल्यांवर बांधकामे झाली आहेत. लोकवस्त्यांच्या सुरक्षिततेसाठी ती काढण्याचा आदेश देऊनही कामे झाली नसल्याचेही अहवालात स्पष्ट केले आहे. नाले बुजविले गेले आहेत. काही ठिकाणी ते वळविले आहेत. सांडपाणी वाहिन्यांची कामे झाली नाहीत. ही वस्तुस्थिती महापालिकेच्या नजरेत आली आहे. तरीही ही कामे करण्याची गरज दाखवून वेळोवेळी खर्च झाल्याचा हिशोब महापालिकेकडे आहे.

महापालिकेच्या हद्दीतून वाहणारा ११.५ किलोमीटर लांबीचाल ओढा धोकादायक झाला आहे. तो सुरक्षित करण्यासाठी नेमके कोणते आणि कसे उपाय करण्यात आले; याचा शोध घेतला; तेव्हा बहुतांशी कामे कागदोपत्रीच झाल्याचे दिसून आले. याआधी १७ कोटी रुपयांची कामे केल्याचे कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयांकडील नोंदीवरून दिसते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कामे सुरू असल्याचा महापालिकेचा दावा
शहरातून तेही लोकवस्त्यांच्या परिसरातून वाहणारा आंबिल ओढा सुरक्षित ठेवण्याच्या योजना जाहीर करण्यात आल्या. त्यासाठी त्या-त्या वेळी क्षेत्रीय कार्यालयाने निविदा काढून कामेही केल्याचे सांगण्यात आले. ओढ्याच्या मूळ प्रवाहातील अडथळे म्हणजे, गाळ काढण्याची कामे प्राधान्याने झाली. त्याचवेळी तेथील सांडपाणी वाहिन्या (ड्रेनेजलाइन) आणि सीमाभिंतींची डागडुजी करण्यात आली आहे. त्यात गेल्या वर्षी पुन्हा ७८ कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यातील कामे सुरू केल्याचे महापालिका सांगत आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आंबिल ओढा पूर्णपणे सुरक्षित होईल. ज्यामुळे लोकवस्त्यांना पुराचा धोका राहणार नाही. यादृष्टीने कामे करीत आहोत. कामाची गरज, प्रत्यक्ष काम आणि त्याचा दर्जा तपासूनच ठेकेदाराला बिले दिली जाणार आहेत. त्यावरील नियंत्रणासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली आहे.
- हेमंत रासने, अध्यक्ष स्थायी समिती, महापालिका

loading image
go to top