

शेतकऱ्याच्या शेडमधून कापसाची चोरी
ॲग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर : लाख शिवारात एका शेतकऱ्याच्या घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये गोण्यांमध्ये भरून ठेवलेला सुमारे एक हजार किलो कापूस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ४० गोण्यांमधील सुमारे ७० हजार रुपये किमतीच्या कापसाची चोरी झाली. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दत्तात्रेय निवृत्ती शेळके (रा. लाख, ता. राहुरी) यांनी फिर्याद दाखल केली.
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातही आता शेतकरी बऱ्यापैकी कापसाचे पीक घेत आहेत. सध्या बऱ्याच भागात कापसाची वेचणी सुरु सुरु झाली आहे. लाख (ता. राहुरी) येथील दत्तात्रेय निवृत्ती शेळके यांनी शेतात पिकवलेला कापूस वेचून मंगळवारी (ता. ६) सायंकाळी पाचच्या सुमारास घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये गोण्यांमध्ये भरून ठेवला. बुधवारी (ता. ७) पहाटे एकच्या सुमारास पिकाला पाणी देऊन परतल्यानंतर गोण्या तपासल्या. त्यावेळी त्या जागेवर होत्या. रात्री दोनच्या सुमारास कुत्रे भुंकल्याने जाग आल्यानंतरही शेडमध्ये पाहिले. तेव्हाही कापसाच्या गोण्या सुरक्षित असल्याचे दिसले. मात्र, पहाटे पाचच्या सुमारास उठल्यानंतर शेडमधील कापसाच्या गोण्या गायब झाल्याचे निदर्शनास आले.
परिसरात तसेच शेतात कुटुंबीयांच्या मदतीने शोध घेतला; परंतु कापूस आढळून आला नाही. अखेर कापूस चोरीला गेल्याची खात्री झाली आहे. बुधवारी (ता. ७) पहाटे दोन ते पाचच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ४० गोण्यांमधील अंदाजे एक हजार किलो कापूस चोरी झाला आहे, असेही फिर्यादीत म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.