
Cough Syrup Alert
sakal
पुणे : खोकल्याची औषधे तयार करणाऱ्या दोन कंपन्यांच्या कफ सिरपमध्ये ‘डायथिलीन ग्लायकॉल’ हे रसायन प्रमाणापेक्षा जास्त आढळल्याचे तपासणीतून समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए, औषध विभाग) त्यापैकी ‘रेडनेक्स फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या ‘रेसिफ्रेश टी आर’ या कफ सिरपचा १३ लाख रुपयांचा साठा जप्त केला आहे. त्याची विक्री व वितरण थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.