
Cough Syrup Warning
Sakal
पुणे : पाच वर्षांच्या आतील बालकांना खोकल्यावर कफ सिरप दिले जाते. परंतु, प्रत्येक वेळी औषधाची आवश्यकता असतेच असे नाही. हे विषाणूजन्य आजार स्वतःहूनही बरे होतात. पालकांनी हे औषध स्वतःहून मेडिकलमधून घेऊ नये. बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा व त्यांनी लिहून दिले तरच औषध द्यावे, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ, वरिष्ठ वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.