esakal | सहकार कायद्यात बदल करण्यासाठी परिषदेने शिफारस करावी : उपमुख्यमंत्री अजित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

pune

सहकार कायद्यात बदल करण्यासाठी परिषदेने शिफारस करावी : उपमुख्यमंत्री अजित पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यातील सहकार चळवळ सक्षम करण्यासाठी सहकार कायद्यामध्ये जे बदल आवश्यक आहेत, त्याची शिफारस राज्य सहकार परिषदेने सरकारकडे करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विद्याधर अनास्कर यांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथील परिषदेच्या कार्यालयात शुक्रवारी पदाचा कार्यभार स्वीकारला. या वेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सहकार परिषदेच्या कार्यालयास सदिच्छा भेट देऊन अनास्कर यांना शुभेच्छा दिल्या. (Pune News)

हेही वाचा: आमचे कार्यकर्ते थुंकले तरी सरकार वाहून जाईल- भाजप नेत्या

सहकार चळवळ सक्षम करण्यासाठी सहकार कायद्यामध्ये जे जे बदल आवश्यक आहेत, त्याबाबत परिषदेने राज्य सरकारकडे तत्काळ शिफारस करावी. सहकार परिषदेसाठी राज्य सरकारकडून काय काय अपेक्षा आहेत, त्याही सादर कराव्यात, अशा सूचना पवार यांनी दिल्या. सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त शेखर गायकवाड आणि सहकार व पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.

loading image
go to top