भजी-पकोडा विकण्याचा सल्‍ला देणारांकडून बेरोजगारांची थट्टा : अजित पवार

मिलिंद संधान
रविवार, 9 डिसेंबर 2018

नवी सांगवी (पुणे) : " सत्तेवर येण्यापुर्वी मोदीसरकारने वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र रोजगारा ऐवजी भजी- पकोडा विकण्याचा बिनकामी सल्‍ला देऊन प्रधानसेवकाने बेरोजगारांची क्रुर थट्टा केली आहे. त्यामुळे या सरकारने युवकांबरोबर सामान्य नागरिकांचा विश्वास गमावला असून येत्या निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब दिसल्याशिवाय रहाणार नाही. ",असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले.

नवी सांगवी (पुणे) : " सत्तेवर येण्यापुर्वी मोदीसरकारने वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात मात्र रोजगारा ऐवजी भजी- पकोडा विकण्याचा बिनकामी सल्‍ला देऊन प्रधानसेवकाने बेरोजगारांची क्रुर थट्टा केली आहे. त्यामुळे या सरकारने युवकांबरोबर सामान्य नागरिकांचा विश्वास गमावला असून येत्या निवडणुकीत त्याचे प्रतिबिंब दिसल्याशिवाय रहाणार नाही. ",असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे केले.

नाना काटे सोशल फाऊंडेशनच्यावतीने बाबुरावजी घोलप महाविद्यालयात 'जॉब फेअर'चे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्‌घाटन पवार यांच्या हस्‍ते करण्यात आले आहे. त्यावेळी त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी व्यासपिठावर मेळाव्याचे आयोजक आणि नगरसेवक नाना काटे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अजिंक्‍य राणा पाटील, युवा नेते पार्थ अजित पवार, डॉ संदीप कदम, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, रोहित पवार, वैशाली काळभोर, दत्ता साने, मंगला कदम, प्राचार्य डॉ बाळकृष्ण झावरे, विशाल वाकडकर, सुनिल गव्हाणे, भाऊसाहेब भोईर हनुमंत गावडे, प्रशांत शितोळे, शाम लांडे, अतुल शितोळे, प्रभाकर वाघेरे, राजेंद्र जगताप, माई काटे, उषा काळे, निकीता कदम, श्रीधर वाल्हेकर, फजल शेख, माऊली सुर्यवंशी, बापू बनसोडे, सुषमा शितोळे, सुषमा तनपुरे, शमीम पठाण, गणेश भोंडवे, राजेंद्र साळुंके, हरिभाऊ तिकोणे, गोरक्ष लोखंडे, सुमनताई नेटके, दिलीप बालवडकर, पै विजय गावडे, मुख्याध्यापक श्रीकृष्ण माळी, विकास शिंदे, यांच्यासह आजीमाजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. या जॉब फेअरमध्ये माहिती तंत्रज्ञान ते औद्योगिक उत्‍पादन करणाऱ्या विविध क्षेत्रातील 116 कंपन्या सहभागी झाल्‍या तर पाच हजार युवकांनी ऑन लाईन नोंदणी केली. मेळाव्यास युवकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला.

माजी उपमुख्यमंत्री पवार म्‍हणाले, " बेरोजगारांनी नाऊमेद न होता नैराशयातून व्यसनाधीन होऊ नये. जगद्‌गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितल्‍याप्रमाणे संयम बाळगावा. प्रत्येकाच्या आयुष्यात संधी येत असतात. इच्छा शक्‍तीच्या जोरावर आणि आलेल्‍या संधीचा योग्य वापर करून यश सहज प्राप्त करता येते. अनेक सरकारी आस्थापनांमध्ये रिक्‍त जागांची संख्या मोठी आहे. पुणे जिल्‍हा शिक्षण मंडळ संचलित विविध शैक्षणिक आस्थापनांमध्ये पाचशे जागा रिक्‍त असून रयत शिक्षण संस्थेत अडिच हजार पदे रिक्‍त आहेत. सरकारने याबाबत धोरण निश्चित करून गुणवत्ता पात्र सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्‍ध करून द्यावा. 
   
सुत्रसंचालन प्राचार्य डॉ बाळकृष्ण झावरे यांनी केले. प्रास्ताविक मेळाव्याचे आयोजक व नगरसेवक नाना काटे यांनी केले तर आभार नगरसेविका शितल नाना काटे यांनी मानले. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Counsel for selling bhaji-pakoda jokes unemployed said Ajit Pawar