bajaj pune marathon
sakal
पुणे - ‘सकाळ’ आयोजित ‘बजाज पुणे मॅरेथॉन २०२५’च्या काउंटडाउनला शुक्रवारापासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रंगलेल्या एक्स्पोने उत्साहात सुरुवात झाली. रविवारी (ता. १४) होणाऱ्या या मॅरेथॉनसाठी देश-विदेशातील धावपटू पुण्यात दाखल झाले असून, बिब, गुडी बॅग व टी-शर्ट घेण्यासाठी सकाळपासूनच सहभागींची मोठी गर्दी उसळली. मॅरेथॉनच्या पूर्वतयारीला एक्स्पोने सुरुवात झाली असून विद्यापीठ परिसरात फिटनेसचा जल्लोष आणि मॅरेथॉनमध्ये सहभागी धावपटूंचा जोश पाहायला मिळत आहे.