यूपीला निघालेलं जोडपं म्हणतंय, "हालात सामान्य हुए तो लौटेंगे...' 

daund railway
daund railway
Updated on

 दौंड (पुणे) : ""मैं प्रेग्नंट थी फिर भी हॉस्पिटल जाने के लिए गाडी (रुग्णवाहिका) आसानी से नहीं मिली...एक महिना और बीस दिन में शासन की तरफ से मदद नहीं मिली, जो मिली वह स्थानीय लोगों को मिली...गांव जाने के लिए ट्रेन का इंतजाम हुआ यहीं खुशी की बात है...हालात सामान्य हुए तो लौटेंगे,'' अशी माहिती मुकादमवाडी (ता. दौंड) येथून विशेष श्रमिक एक्‍स्प्रेसने उत्तर प्रदेशकडे निघालेल्या संगीता उत्तम यांनी दिली. 

दौंड रेल्वे स्थानक येथे आज (ता. 21) खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने कुरकुंभ एमआयडीसी व दौंड तालुक्‍यातील 1101 मजुरांना घेऊन विशेष श्रमिक एक्‍स्प्रेसने उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगरकडे रवाना झाली. तहसीलदार संजय पाटील यांनी या एक्‍सप्रेसला हिरवा झेंडा दाखविला. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

श्रमिक एक्‍सप्रसने फतेहपूर येथे निघालेल्या संगीता उत्तम यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी त्यांचे पती कुरकुंभ एमआयडीसीमधील एका धाग्याच्या कंपनीत पर्यवेक्षक असल्याचे सांगितले. लॉकडाउनच्या काळात अन्नधान्यापासून सगळ्या गोष्टींची अडचण झाली. गर्भवती असल्याने रुग्णालयात तपासणीसाठी जायचे होते, परंतु दुचाकीवर जाता येत नव्हते. रूग्णवाहिकेला कॉल केला; तर ती सहज उपलब्ध झाली नाही. त्यासाठी दोन दिवस वाट पाहावी लागली, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. 

लॉकडाउनमुळे कंपनी बंद असून, गेली पन्नास दिवस ते मुकादमवाडी येथील भाड्याच्या घरात राहत होते. पन्नास दिवस उपलब्ध पैशांच्या साह्याने गुजराण केली, परंतु परिस्थिती बिकट होऊ लागल्याने आणि सुदैवाने ट्रेनची व्यवस्था झाल्याने गावाकडे निघालो, अशी माहिती अनुप उत्तम यांनी दिली. 

शिवप्रकाश यादव हे कुरकुंभ एमआयडीसी येथे कंपनीत पर्यवेक्षक असून, उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातील रहिवासी आहे. कंपनी बंद होती व घरमालकाने पूर्ण भाडे घेतल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. लॉकडाउनच्या तक्रारी असल्या, तरी गावी जाण्यासाठी विशेष एक्‍सप्रेसची सोय झाल्याने मजुरांचे कुटुंबीय आनंदी असल्याचे पाहावयास मिळाले. स्थिती पूर्वपदावर आल्यानंतर पुन्हा रोजगारासाठी येणार असल्याचा मनोदय मजुरांनी व्यक्त केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com