उद्धव ठाकरे यांना अमोल कोल्हे म्हणाले, "हे काम कराच...' 

Amol-Kolhe- udhav  thakare
Amol-Kolhe- udhav thakare

नारायणगाव (पुणे) : ""जुन्नर तालुक्‍यातील निसर्गरम्य माळशेज परिसरात अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे चित्रीकरण होत असते. जुन्नर तालुक्‍याला पर्यटन दर्जा मिळाला आहे. त्यामुळे या भागात सरकारने चित्रनगरी प्रकल्पाची उभारणी करावी,'' अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. 

लॉकडाउन शिथिल करण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर नाट्य, चित्रपट व मालिका निर्मात्यांशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी बुधवारी (ता. 20) व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे, खासदार डॉ. कोल्हे, अभिनेते सुबोध भावे, प्रशांत दामले, केदार शिंदे, पुष्कर क्षोत्री, आदेश बांदेकर, प्रसाद कांबळी, रत्नाकर जगताप, निखिल साने, सुशांत शेलार आदी उपस्थित होते. 

या बैठकीत आपली भूमिका स्पष्ट करताना डॉ. कोल्हे म्हणाले, ""रोजगाराच्या विकेंद्रीकरणाच्या दृष्टिकोनातून मुंबईसह इतर ठिकाणी देखील चित्रिकरण करण्यासाठी चित्रनगरी प्रकल्प राबवता येऊ शकेल. कोल्हापूरप्रमाणेच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे चित्रीकरण जुन्नरलगतच्या माळशेज परिसरात होत असते. पर्यटन तालुक्‍याचा दर्जा मिळाला असल्याने जुन्नर तालुक्‍यात चित्रनगरी प्रकल्प उभारल्यास या भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.'' 

तमाशा कलावंतांबाबतही मागणी 
डॉ. कोल्हे म्हणाले, ""लॉकडाउनमुळे या वर्षी लोकनाट्याचे कार्यक्रम झाले नाहीत. तमाशा फडमालकांचा संपूर्ण हंगाम वाया गेला आहे. फडमालक, तमाशा कलावंत व त्यांचे कुटुंबीय आदींना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्यासमोर उपासमारीची वेळ आली आहे. अडचणीत आलेल्या फडमालकांना दिलासा देण्यासाठी विनातारण कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज आहे. फडमालकांना आर्थिक आधार दिला नाही; तर महाराष्ट्राची पारंपरिक लोककला धोक्‍यात येईल.''  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com